पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA Test : नदीम संधीचं सोनं करणार?

शाहबाद नदीम

झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या रांचीच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चायना मॅन कुलदीपला संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र नाणेफेकीवेळी विराटने संघ जाहीर करुन ही चर्चा फोल ठरवली. रांचीच्या मैदानात एका नव्या गोलंदाजाला संधी देण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. 

INDvsSA Day 1 Stumps : भारत ३ बाद २२४ धावा (५८)

झारखंडशी संबंधीत असलेल्या डावखुऱ्या फिरकीपटू शाहबाद नदीम कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा २९६ वा खेळाडू आहे. कुलदीप यादवचा बॅकअप म्हणून कसोटी संघात स्थान मिळालेल्या नदीमला ईशांत शर्माच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेट आणि इंडिया 'अ' कडून त्याने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. प्रथम श्रेणीतील ११० सामन्यात त्याने ४२४ बळी मिळवले असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील ६४ सामन्यात त्याने ४२ बळी मिळवले. नदीमच्या नावे रणजी चषकातील सलग दोन हंगामात ५० हून अधिक बळी मिळवण्याच्या विक्रमाची नोंद आहे. २०१५-१६ मध्ये त्याने ५१ तर २०१६-१७ मध्ये त्याने ५६ बळी टिपले होते. 

रोहितच्या विक्रमाचा धडाका सुुरुच, आता थेट सनी पाजींच्या पंक्तीत

मागील वर्षी विजय हजारे चषकात राजस्थान विरुद्ध १० षटकात १० धावा खर्च करुन ८ बळी टिपण्याचा पराक्रम केला होता. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये विंडीज विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र मैदानात उतरण्याची संधी मिळाली नव्हती. सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीचे त्याला अखेर फळ मिळालंय म्हणायला हरकत नाही. पण या संधीच तो फायदा उठवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs south africa here is some amazing figures of spinner shahbad nadeem who became 296th Test player of India