भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दृष्टीस पडला नाही. पण सामना आणि मालिका संपुष्टात येताच रांचीचा हा 'राजकुमार' जेएससीए स्टेडियममध्ये आला आणि त्याने प्रशिक्षक रवी शास्त्री आणि आपल्या इतर सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेतले. विराटच्या टीमने द.आफ्रिकेचा एक डाव आणि २०२ धावांनी पराभव केला.
रवी शास्त्री यांनी धोनीबरोबरचे छायाचित्र टि्वटरवर शेअर करत लिहिले की, मालिकेत शानदार विजय मिळाल्यानंतर भारतीय दिग्गजाला पाहणे कमालीचा अनुभव आहे.
Great to see a true Indian legend in his den after a fantastic series win #Dhoni #TeamIndia #INDvsSA pic.twitter.com/P1XKR0iobZ
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) October 22, 2019
दुसरीकडे विराट कोहलीला पत्रकार परिषदेत धोनीबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो म्हणाला की, तो ड्रेसिंग रुममध्ये आहे. तुम्ही तिथे जाऊन त्याला हॅलो म्हणू शकता.
भारताला दोन विश्वचषक (टी २० आणि वनडे) मिळवून देणारा ३७ वर्षीय विकेटकिपर फलंदाज धोनीच्या भविष्याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. मागील विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर धोनीने विश्रांती घेतली होती. पण त्याने भविष्याच्या योजनेबाबत काही सांगितलेले नाही.
Look who's here 😍 pic.twitter.com/whS24IK4Ir
— BCCI (@BCCI) October 22, 2019
यादरम्यान त्याने प्रादेशिक सैन्यदलात सेवा केली. तिथे तो मानद लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. त्यानंतर त्याने अमेरिकेत गोल्फचाही आनंद घेतला. बीसीसीआयनेही धोनीचे छायाचित्र शेअर केला आहे. यात धोनी नवोदित फिरकीपटू शाहबाज नदीमबरोबर चर्चा करताना दिसतोय. नदीमने या सामन्यात ४ विकेट टिपल्या.