भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेत यशस्वी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांना संधी देण्यात आलेली नाही. या दोन्ही प्रतिभावंत खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याचे कारण निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
'भारताच्या दबावामुळेच श्रीलंकन खेळाडू पाकमध्ये खेळण्यास तयार नाहीत'
एमएसके प्रसाद म्हणाले की, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्यांचा प्रयोग सुरु आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये विविधता आणण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे. दोन्ही प्रतिभावंत फिरकीपटू (चहल आणि यादव) हे देखील आगामी टी-२० विश्वचषकासाठी प्रमुख दावेदारांच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, असेही ते म्हणाले.
ऐतिहासिक विजयानंतर अफगानच्या बच्चे कंपनीचा VIDEO व्हायरल
कुलदीप आणि युजवेंद्र या दोघांना वेस्टइंडीज दौऱ्यावर देखील भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यांच्या ऐवजी आफ्रिकेविरुद्ध पुन्हा एकदा राहुल चाहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली आहे. ही जोड आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.