पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvSA T20 : कोहलीनं रागानं स्टम्प तोडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोहालीच्या मैदानात विराट कोहलीच्या दमदार फलंदाजी केली. मात्र क्षेत्ररक्षणादरम्यान विराटचा आक्रमक अंदाजही फलंदाजी इतकाच चर्चेचा विषय ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावात तो संताप व्यक्त करताना दिसला. आपला राग अनावर झालेल्या कोहलीने स्टम्प तोडल्याचे पाहायला मिळाले.  

INDvsSA : विराटशी हस्तांदोलन करण्यासाठी चाहत्याची 'धावपळ'

टुम्बा बुवामा आणि डी कॉक फलंदाजी करत असताना हा सर्व प्रकार घडला. या दोघांनी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना कोहली स्टम्प कव्हर करण्यासाठी आला होता. श्रेयस अय्यरने अचूकपणे थ्रो न केल्याने विराट चांगलाच संतापला. त्याने आपला सर्व राग स्टम्पवर व्यक्त केला. आफ्रिकेला या चेंडूवर तीन धावा मिळाल्या. विराटला याठिकाणी विकेट अपेक्षित होती, हे त्याच्या वर्तनावरुन दिसून आले. 

कोहलीच्या 'विराट' विक्रमानंतर आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया

श्रेयय अय्यरच्या क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त करणारा कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. भारतीय संघाने या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये दमदार गोलंदाजी करत अखेरच्या चार षटकात केवळ २४ धावा दिल्या होत्या. दिपक चाहरने अवघ्या २२ धावा खर्च करत आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले होते.