पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA Test : रांचीच्या मैदानात कर्णधार कोहलीने रचला इतिहास

विराट कोहलीने सर्वाधिक वेळा फॉलोऑन दिला आहे.

झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या रांचीतील मैदानात कर्णधार विराट कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्यांदा फॉलोऑन दिला. आफ्रिकेला पहिल्या डावात १६२ धावांत  रोखत त्यांना पुन्हा फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यानंतर विराटच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली. प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा फॉलोऑन देणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी पोहचला आहे.

INDvsSA : वाघ आला पळा पळा...! विराटच्या फोटोवर भन्नाट रिअ‍ॅक्शन

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ८ वेळा प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन दिला आहे. त्याच्या पाठोपाठ माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या स्थानावर आहे. अझरुद्दीनने ७ वेळा प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला होते. भारतीय संघाला टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारताच्या यशस्वी कर्णधाराने अर्थात महेंद्रसिंह धोनने ५ वेळा फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला होता. तर भारताच्या संघबाणीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या आणि नुकतेच आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या सौरव गांगुलीने ४ वेळा फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे.   

'या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट सेनेला रोखण्याचा दम'

१९९३-९४ मध्ये घरच्या मैदानावर भारताने पहिल्यांदा श्रीलंका संघाला दोनवेळा फॉलोऑन दिला होता. दक्षिण आफ्रिकेवर मालिकेत दोनवेळा फॉलोऑन पत्करण्याची नामुष्की तिसऱ्यांदा ओढावली आहे. १९६४-६५ मध्ये इंग्लंडने त्यांना दोन वेळा तर २००१-०२ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना एका मालिकेत दोनवेळा फॉलोऑन दिला होता.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa 3rd Test Virat Kohali set new Record Enforcing follow on most times among Indian captains