पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साहाने सोडले मैदान! बॅकअप मॅन पंतने घेतली जागा

ऋषभ पंत

रांचीच्या मैदानात भारताने पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था केवीलवाणी केली आहे. पहिला डाव १६२ धावात आटोपल्यानंतर विराटने आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजांसमोर आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा गुडघे टेकले. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील २६ व्या षटकातील रविचंद्रन अश्विननच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिमागे असलेल्या वृद्धिमान साहाला दुखापत झाली. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

या झेलसाठी तर साहाला पार्टी द्यावी लागणार : उमेश यादव

आयसीसीच्या नव्या नियमावलीनुसार, भारताकडून राखीव यष्टिरक्षक ऋषभ पंतने त्याची जागा घेतली आहे. या सामन्यातील खेळाडूने मैदान सोडल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी डीन एल्गरला उमेश यादवचा चेंडू लागल्यानंतर मैदान सोडावे लागले होते. २९ चेंडूत ३ चौकारासह १६ धावा करुन रिटायर हर्ट झाल्याचे पाहायला मिळाले होते. डी ब्र्युएनने त्याची जागा घेतली होती. 

INDvsSA Test : रांचीच्या मैदानात कर्णधार कोहलीने रचला इतिहास

उल्लेखनिय आहे की, यापूर्वी दुखापतीमुळे साहा इंग्लंड दौऱ्याला मुकला होता तसेच खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही पाणी सोडावे लागले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच्या  मागील कामगिरीच्या जोरावर त्याला पुन्हा संघात स्थान देण्यात आले. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमकेप्रसाद यांनी पंतला सर्वाधिक पसंती असेल, असे स्पष्ट केल्यानंतर साहा कमबॅक करणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मात्र विंडीज दौऱ्यावरील पंतचा फ्लॉप शोमुळे साहाला आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात स्थान मिळाले. त्याने संधीच सोनं देखील केले. पुण्याच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने यष्टिमागे कमालीचे झेल टिपले होते. त्याच्या या कामगिरीची चांगलीच चर्चा रंगली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India vs South Africa 3rd Test saha walks off field after getting hit on fingertips pant comes