India vs South Africa, 3rd Test at Ranchi Day 1: भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने रांचीच्या मैदानात पहिल्या दिवशी शतक साजरे केले. आघाडीची फळी कोलमडल्यानंतर त्याने अजिंक्य रहाणेच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील रोहित शर्माचे हे तीसरे शतक आहे. या शतकासह त्याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली.
INDvsSA Day 1 Stumps : भारत ३ बाद २२४ धावा (५८)
एका कसोटी मालिकेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतके झळकवणारा भारताचा दुसरा सलामीवीर फलंदाज आहे. यापूर्वी सनील गावसकर यांनी असा पराक्रम तब्बल तीनवेळा केला आहे. सुनील गावसकर यांनी १९७९-७१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील ८ डावात ४ शतके, १९७८-७९ मध्ये आफ्रिकेविरुद्धच्या ६ सामन्यांच्या मालिकेतील ९ डावात ४ शतके तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील ९ डावात ३ शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
लेग स्पिनरला न खेळवल्याने २ प्रशिक्षकांचे निलंबन
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा सलामीची जबाबदारी सांभाळताना द्विशतकी सलामी दिली होती. विशाखापट्टणमच्या मैदानातील सूर त्याने पुण्याच्या मैदानातही कायम ठेवत दुसऱ्या कसोटीत त्याने शतकी खेळी केली. त्यानंतर रांचीच्या मैदानात त्याने आणखी एक शतक आपल्या खात्यात जमा केले आहे.
RCB च्या स्टाफमध्ये महिला मसाज थेरेपिस्टचा समावेश
याशिवाय रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. यामालिकेपूर्वी रोहितच्या नावे तीन शतके होती. तो आकडा आता सहावर पोहचला आहे. आतापर्यंतच्या ३० कसोटी सामन्यात त्याच्या नावे १० अर्धशतकांची नोद आहे.