पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvSA: राग नडला! दुखापतीमुळे मार्करम कसोटीला मुकणार

मार्करम

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यातच काम तमाम झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला रांची कसोटीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. 

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच सौरव गांगुली घेणार हा मोठा निर्णय

पुण्याच्या मैदानात दुखापत झाल्याने सलामीवर मार्करम तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे. यापूर्वी फिरकीपटू केशव महाराज जायबंदी झाल्यामुळे संघाबाहेर गेला होता. मार्करम भारताविरुद्धच्या सामन्यात नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला होता. विशेष म्हणजे त्याला जी दुखापत झाली आहे ती सराव वैगेरे किंवा प्रतिस्पर्धी संघाकडून एखादा चेंडू लागल्याने नाही तर राग व्यक्त करताना झाली आहे. 

मुंबईकराचा द्विशतकी विश्वविक्रम 'यशस्वी'

पुण्याच्या मैदानात दोन्ही डावात मार्करम शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात ज्यावेळी तो पायचित झाला त्यावेळी मैदानातील पंचांनी बाद ठरवल्यानंतर त्याने सहकारी एल्गरसोबत चर्चा केली. पण रिव्ह्यू घेतला नाही. रिप्लायमध्ये चेंडू स्टम्प बाहेर जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. रिव्ह्यू घेतला असता तर विकेट वाचली असती हे जाणवल्यानंतर स्वत:वरील राग व्यक्त करण्यासाठी त्याने उजवा हात कठोर जागेवर आपटला. यात त्याला दुखापत झाली. यातून सावरला नसल्यामुळे आता त्याला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागणार आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs south africa 3rd test match aiden markram hurts hand in act of frustration will not play in ranchi test