रांचीच्या मैदानात विराट ब्रिगडने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि २०२ धावांनी दारुण पराभव करत मालिका ३-० अशी खिशात घातली. सलामीवीर रोहित शर्माचे द्विशतक (212), उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक (११५) आणि रविंद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ९ बाद ४९७ धावांवर डाव घोषित केला. आफ्रिकेला दोनवेळा खेळूनही भारताने उभारलेल्या धावसंख्येच्या जवळपास पोहचता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा गुडघे टेकायला भाग पाडले.
India vs South Africa- 3rd Test: India wins by an innings and 202 runs, win the series 3-0 pic.twitter.com/fQn8noGvcK
— ANI (@ANI) October 22, 2019
मुलुंडमध्ये नाराज पीएमसी बँक खातेधारांनी निवडला 'नोटा' पर्याय
आफ्रिकेच्या पहिल्या डावात शमीने सर्वाधिक तीन तर उमेश यादव, जडेजा, अश्विन आणि नदीम यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी टिपले. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात शमीने आणखी तीन गडी बाद करत सामन्यात सर्वाधिक ६ बळी मिळवले. यादवने २ नदीम २ आणि अश्विन-जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी मिळवत त्याला उत्तम साथ दिली.
रात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक घरांत शिरले पाणी
पहिल्या डावात आघाडी सपशेल फेल ठरल्यानंतर झुबेयर हम्जा (६२), जॉर्ज लिंडे (३७) आणिल तेम्बा बव्हुमाच्या ३२ धावांच्या खेळीमुळे आफ्रिकेने रडत खडत १६२ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने त्यांना पुन्हा फलंदाजीस आमंत्रित केले. या निर्णयासह विराट प्रतिस्पर्ध्याला सर्वाधिकवेळा फॉलोऑन देणारा भारतीय कर्णधार ठरला. त्याने आठव्यांदा एखाद्या संघाला फॉलोऑन दिला.
... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही
भारताच्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या डावातही आफ्रिकेचा फ्लॉप शो कायम राहिला. क्विंटन डी कॉकला उमेश यादवने अवघ्या 5 धावांवर माघारी धाडले. यादवचा एक चेंडू लागल्याने एल्गरला मैदान सोडावे लागले. तो १६ धावांवर रिटायर हर्ट होऊन परतला. त्याच्या ऐवजी मैदानात उतरलेल्या थेयूनिल ब्रुयनने दुसऱ्या डावात सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. जॉर्ज लिंडे (२७), डेन (२३) आणि रबाडा १२ वगळता अन्य एकाही फलंदाजाला वैयक्तिक दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही.
मुसळधार पावसानंतर नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहू लागला