पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA Day 3 Stumps : विजयासाठी चौथ्या दिवसाच्या खेळाची प्रतिक्षा

आफ्रिकेचा संघ पराभवाच्या छायेत

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या रांची कसोटीत भारताने आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १६२ धावात आटोपला. पुण्याच्या मैदानातील फॉलोऑननंतर सलग दुसऱ्यांदा कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिला असून पहिल्या धावात भारताने ३३५ धावांची आघाडी घेतली आहे. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाचीही सुरुवात खराब झाली आहे. उमेश यादवने क्विंटन डी कॉकला (५) धावांवर तर शमीने झुबेयरला शून्यावर बाद करत आफ्रिकेला पुन्हा दोन धक्के दिले. तिसऱ्या दिवसाअखेर आफ्रिकेन १३२ धावांत ८ गडी गमावले असून भारत आणखी एका मोठ्या विजयापासून दोन पावले दूर आहे. चौथ्या दिवशी किती वेळात भारतीय संघ आफ्रिकेला गुंडाळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

INDvsSA Day 2 Stumps : आफ्रिका २ बाद ९ धावा, दुसरा दिवसही भारताचाच!

तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा कर्णधार  फाफ ड्युप्लेसीस आणि झुबेयर यांनी  २ बाद ९ या धावसंख्येवरुन खेळ पुढे नेण्यास सुरुवात केली. उमेश यादवने फाफला अवघ्या एका धावेवर बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर झुबेयर (६२) आणि बव्हुमा (३२) धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रविंद्र जडेजाने झुबेयरला बाद करत भारताला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यापाठोपाठ कसोटी पदार्पण करणाऱ्या नदीमने बव्हुमाला बाद करत आफ्रिकेच्या अडचणी वाढवल्या. 

6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम!

अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर जॉर्ज लिंडेने ८१ चेंडूत ३७ धावांची खेळी करत मैदानात तग धरण्याची हिमंत दाखवली. दुसऱ्या बाजूने क्लासेन (६), डेन (४), रबाडा (०) बाद झाले. जॉर्ज लिंडेच्या  मनसुब्यांना सुरुंग लावला. रोहितने त्याचा अप्रतिम झेल टिपला. नदीमने नार्किओला शून्यावर माघारी धाडत आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत आटोपला. उमेश यादवने सर्वाधिक तीन तर शमी,नदीम आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रबाडाच्या रुपात आफ्रिकेचा एक गडी धावबाद झाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa 3rd Test Day 3 ranchi test india forced south africa to follow on got 335 runs lead