पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA : फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या मैदानात पाऊस बॅटिंग करणार?

भारतीय संघ सराव करतानाचा क्षण

India vs South Africa 2019, 3rd T20I at  Bengaluru: मोहालीच्या मैदानातील दमदार विजयानंतर भारतीय संघ आज बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. तर दुसरीकडे आफ्रिकेचा संघ मालिका गमावू नये, यासाठी प्रयत्नशील असेल.

युवा खेळाडूंबाबत गब्बरचा कर्णधार कोहलीपेक्षा हटके विचार

धर्मशाला येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर मोहालीच्या मैदानात भारताने आफ्रिकेला एकतर्फी मात दिली होती. पाहुण्या संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रथम फलंदाजी करताना किमान १८० धावा कराव्या लागतील. तरच त्यांच्या गोलंदाजांना थोडीफार संधी मिळू शकेल. दुसऱ्या सामन्यात त्यांना हे जमलं नव्हते. 

पिच रिपोर्ट
एम. चिन्नास्वामी स्टेडियम छोटे असल्यामुळे फलंदाजांसाठी इथे अधिक संधी असेल. खेळपट्टीवरी बाउंस हा फिरकीपटूंना फायदेशीर ठरु शकतो. आयपीएलमध्ये या मैदानात सरासरी १८० धावा झाल्याचे पाहायला मिळाले होते.   
हवामानाचा अंदाज

गिब्जनं शेअर केला कोहलीचा अकरावर्षांपूर्वीचा 'तो' व्हिडिओ

बेंगळुरुमध्ये  ढगाळ वातावरण असून  एक्यू वेदरच्या वृत्तानुसार, बंगळुरुमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावरही पावसाचे सावट घोंगावत आहे. पाऊस झाला तर आफ्रिकेच्या संघाची बरोबरी साधण्याची संधी मिळणार नाही. परिणामी याचा फायदा हा भारतीय संघालाच होईल.  

भारताचा संभाव्य संघ :

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, नवदीप सैनी, दिपक चाहर.
 
दक्षिण अफ्रिकेचा संभाव्य संघ :
क्विंटन डीकॉक (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रासी व्हॅन डर डुसेन, तेम्बा बव्हुमा, ज्युनियर डाला, जॉर्न फॉर्च्युन, ब्युरेन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, अँडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियअस, कॅगिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॉर्ज लिंडे 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa 3rd T20I Dream11 ind vs sa predicted Playing XI Pitch Report weather forecast team update head to head stats for M Chinnaswamy Stadium in Bengaluru