पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA ...म्हणून हनुमा विहारीला डावलून उमेश यादवला संधी

उमेश यादव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात एकमात्र बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. खेळपट्टीचा विचार करुन विंडीजविरुद्धच्या कसोटीत दमदार कामगिरी केलेल्या हनुमा विहारीच्या जागेवर जलदगती गोलंदाज उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त बुमराहाच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या उमेश यादव भारताचा हुकमी एक्का ठरु शकतो. त्यामुळेच त्याला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. 

IND vs SA 2nd test Day 1 : अपडेट्स  

उमेश यादव अशा सात गोलंदाजांपैकी एक आहे. ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक बळी मिळवले आहे. विशेष म्हणजे इतर गोलंदजांच्या तुलनेत उमेश यादवचे स्टाइक रेट अधिक उत्तम आहे. उमेश यादवने भारताकडून ४१ कसोटी सामने खेळले आहेत. यातील १७ परदेशात तर २४ सामने हे घरच्या मैदानावर खेळले आहेत. परदेशात खेळताना त्याने ४६ फलंदाजांना तंबूत धाडले आहे.  

IND vs SA :... म्हणून या पिच क्यूरेटरची असेल खरी 'कसोटी'

कपिल, झहीर आणि श्रीनाथच्याही एक पाऊल पुढे 
उमेश यादवच्या  स्ट्राइक रेटचा विचार केला तर तो भारताचे दिग्गज अष्टपैलू कपिल देव, जलदगती गोलंदाज जवागल श्रीना‌थ  झहीर खान, ईशांत शर्मा ,करसन घावरी आणि रमाकांत देसाई यांच्यापेक्षा पुढे आहे.  उमेश यादवने घरच्या मैदानावर २४ कसोटी सामन्यात ५२.८. च्या सरसरीने ७३ बळी टिपले आहेत. कपिल देव यांनी ६५ सामन्यात  ५५.७ च्या स्टाइक रेटने २१९, श्रीनाथने ५५.८ च्या स्ट्राइक रेटने १०८, झहीरने ७०.२ च्या स्ट्राइक रेटने १०४, ईशांतने ६९.३ च्या स्ट्राइक रेटने ८४, घावरीने ६१ च्या स्ट्राइक रेटने ७७ तर देसाई यांनी ६८ च्या स्ट्राइक रेटने ५७ बळी मिळवले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs south africa 2nd test umesh yadav will play important role for india against south africa