भारतीय संघाचा हुकमी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानात अनोखा विक्रम आपल्या नावे केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी त्याने चार बळी टिपले. रबाडाला बाद करत अश्विनने आफ्रिकेविरुद्ध ५० बळी मिळवण्याचा टप्पा पार केला. आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी करणारा अश्विन चौथा भारतीय गोलंदाज ठरला.
जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप : मंजू रानीची फायनलमध्ये धडक
अश्विनने पुण्याच्या मैदानात पाहुण्या संघाचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस (६४), क्विंटन डी कॉक (३१) आणि केशव महाराजा या सेट झालेल्या फंलदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रबाडाला बाद करत त्याने आफ्रिकेच्या संघाला २७५ धावांवर आटोपण्यास हातभार लावला. कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी सर्वाधिक ८४ बळी मिळवले आहेत. त्यापाठोपाठ श्रीनाथ आणि हरभजन सिंग यांनी अनुक्रमे ६४ आणि ६० बळी टीपले आहेत. या यादीत आता अश्विनही सामील झाला आहे.
INDvsSA : चाहत्यामुळे रोहितची तारांबळ, पुण्याच्या मैदानातील प्रकार
पहिल्या कसोटी सामन्यात देखील अश्विनने लक्षवेधी कामगिरी केली होती. विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात १ बळी मिळवला होता.