पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs SA 2nd test: रोहित-विराट मतभेदाबद्दल चाहत्यांमध्ये अजूनही शंका

विराट कोहली

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील गहुंजेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माला दिलेल्या बढतीसंदर्भात भाष्य केले आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) अधिकृत ट्विटर अकाउंटवरून विराटचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यात विराट कोहलीने रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. उल्लेखनिय आहे की विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर रोहत-विराट यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विराट कोहलीने विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वीच या चर्चेला पूर्ण विराम दिला होता. 

परंतु चाहत्यांना अद्यापही दोघांमध्ये सर्व काही ठिक-ठाक आहे असे वाटत नाही. बीसीसीआयच्या ट्विटर उमटलेल्या प्रतिक्रियातून याची प्रचिती येते. विशाखापट्टणमच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने पहिल्या आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. रोहितच्या शतकानंतर ड्रेसिंगरुममध्ये विराटच्या चेहऱ्यावर देखील आनंदाची झलक पाहायला मिळाली होती.  

Pune Test : जाळीतील सरावात विराट सापडला जडेजाच्या जाळ्यात

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs south africa 2nd test match virat kohli praises rohit sharma here is how fans reacted on this bcci video tweet