पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA 2nd Day Stumps : 'विराट' धावसंख्येसमोर आफ्रिका ३ बाद ३६ धावा

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले आहे

कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद २५४ धावा आणि मयंक अग्रवाल (१०८), रविंद्र जडेजा (९१) आणि रहाणेच्या ५९ धावांच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने पहिल्या दिवशीच्या ३ बाद २७३ धावांवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली.

ND vs SA : किंग कोहलीची रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील २६ शतक पूर्ण केले. तर अजिंक्य राहणेन २० वे अर्धशतक झळकावले. ही जोडी दक्षिण आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरत असताना केशव महाराजाने अजिंक्य रहाणेच्या रुपात भारताला चौथा धक्का दिला. तो ५९ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहलीने रविंद्र जडेजाच्या साथीने भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. शतकाच्या जवळ असताना जडेजा बाद झाला. त्यानंतर कोहलीने  भारताचा पहिला डाव घोषित केला. 

 

पुण्यात रनमशीन बरसली! सचिन, सेहवागचा विक्रम टाकला मागे

बुमराहच्या जागेवर संधी मिळालेल्या उमेश यादवने सुरुवातीलाच आफ्रिकेला धक्के दिले. त्याने मार्करमला खातेही उघडू दिले नाही. त्यानंतर त्याने डेन एल्गरला अवघ्या ६ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मोहम्मद शमीने बव्हुमाला ८ धावांवर बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने ३ बाद ३६ धावा केल्या होत्या.   थेन्यूस डी ब्रूयन २० तर आनरिख नॉर्किआ २ धावांवर खेळत होते.

लाइव्ह अपडेट्स

- मोहम्मद शमीने बव्हुमाला ८ धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला

- यादवने मार्करमनंतर एल्गरला धाडले माघारी 

- दक्षिण आफ्रिकेची खराब सरुवात, पहिला गडी माघारी

भारताचा पहिला डाव : ५ बाद ६०१ धावा

- कर्णधार विराट कोहलीने ५ बाद ६०१ धावांवर भारताचा पहिला डाव घोषित केला. विराट २५४ धावांवर नाबाद राहिला

-  जडेजा नर्वस नाइन्टींचा शिकार, ९१ धावांवर मुथूस्वामीने दाखवला तंबूचा रस्ता

- रविद्र जडेजाने ७९ चेंडूत साजरे केले १२ वे कसोटी अर्धशतक

- विराट कोहली २०८ धावांवर झेलबाद झाला पण मुथूस्वामीचा हा चेंडू नो बॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले.

- कोहलीने कसोटी कारकिर्दीतील आपले सातवे द्विशतक झळकावले

- चहापानापर्यंत भारत ४ बाद ४७३, विराट कोहली-१९४*  तर रविंद्र जडेजा २५ *

-उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपात भाताला चौथा धक्का, त्याने १६८ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ५९ धावांचे योगदान दिले. केशव महाराजाने त्याला डी कॉककरवी झेलबाद केले.

- दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ४०० धावा पूर्ण केल्या.

- विराट कोहलीने उत्कृष्ट कामगिरी करत १५० धावा पूर्ण केल्या. 

- अजिंक्य रहाणे ५९ धावांवर बाद झाला. 

- पहिल्या सत्रामध्ये भारताने ३५६ धावा पूर्ण केल्या आहेत.

- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतक पूर्ण केले.

- भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतक पूर्ण केले.

- विराट कोहलीची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. तर अजिंक्य रहाणे ४१ धावांवर नाबाद आहे. १०२ षटके पूर्ण झाल्यानंतर भारताची धावसंख्या ३२६ झाली आहे.  

- भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत ३०२ धावा पूर्ण केल्या आहेत.

- पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवसाला चांगली सुरुवात झाली आहे.