पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA: ऐतिहासिक शहरातील मैदानात टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना पुण्याच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात वसलेल्या गहुंजेच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात उतरताच भारतीय संघाला एक ऐतिहासिक विक्रम खुणावताना दिसेल.  हा सामना जिंकून भारतीय संघ नव्या विक्रमाला गवसणी घालण्यास उत्सुक असेल. विशाखापट्टणमच्या मैदानात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी पराभूत केले होते. भारतीय संघाचा तोरा असाच कायम राहिला तर पुण्याच्या मैदानात टीम इंडिया नवा इतिहास घडवू शकते.  

IND vs SA 2nd test: रोहित-विराट मतभेदाबद्दल चाहत्यांमध्ये अजूनही शंका

घरच्या मैदानावर सातत्यपूर्ण मालिका विजयाचा विक्रम
जर पुण्याच्या मैदानात भारतीय संघाने विजय संपादीत केला तर तीन सामन्यांची मालिका भारताच्या खिशात पडेल. २०१३ पासून घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत भारताने आतापर्यंत १० मालिका सातत्यपूर्ण जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने आपली विजय मोहिम सुरु केली होती. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सलग ११ मालिका जिंकण्याचा पराक्रम करण्याची भारताकडे संधी असेल.   

INDvSA: दुसरी कसोटी पुण्यात, पण पाण्यात तर नाही ना जाणार?

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजला दोनवेळा तर अन् काही संघाना चारली आहे धूळ 
२०१३ पासून आतापर्यंत घरच्या मैदानावरील दहा कसोटी मालिकेतील विजयात भारताने बांगलादेश, श्रीलंका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांना प्रत्येकी एकदा पराभत केले असून ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजला तब्बल दोनवेळा नमवले आहे. तत्पर्वी २०१२ मध्ये कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने भारताला घरच्या मैदानावर २-१ ने मात दिली होती. 

ऑस्ट्रेलियाचा विक्रम खालसा करण्याची संधी 
पुण्याच्या मैदानातील विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात केलेला विक्रम विराट सेना मोडीत काढेल. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात सातत्यपूर्ण १० कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पुण्याच्या मैदानावर हा विक्रम मोडण्याची भारतीय संघाला संधी आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs south africa 2nd test India will be named huge world record of winning most consecutive test series at home after winning Pune Test