पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाने महाराजला चांगलेच धुतले!

केशव महाराज

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केशव महाराज आपल्या फिरकीतील जादू दाखवण्यात अपयशी ठरला. मात्र आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक इनोक एनक्वे यांना अजूनही त्याच्यावर भरवसा आहे. डावखुरा फिरकीपटू भविष्यात चांगली कामगिरी करुन स्वत:ला सिद्ध करेल, असा विश्वास इनोक एनक्वे यांनी व्यक्त केला आहे. 

जागतिक चॅम्पियनशीपः मेरी कोमला कांस्य पदक, तुर्कीच्या खेळाडूकडून

केशव महाराजने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३१८ धावा खर्च करुन तीन तर दुसऱ्या डावात १२९ धावा खर्च करत २ बळी मिळवले होते. पुण्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने उभारलेल्या ६०१ धावांत महाराजच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांनी १९६ धावांची लयलुट केली. यात त्याला केवळ एक बळी मिळवण्यात यश आले. अजिंक्य रहाणेला त्याने ५९ धावांवर डी कॉककरवी झेलबाद केले होते.  

इराणी महिलांनी 'याची डोळा याची देही' अनुभवला फुटबॉल पाहण्याचा आनंद

त्याच्या या कामगिरीवर एनक्वे म्हणाले की, महाराजा एक चांगला फिरकीपटू आहे. ध्येयापासून भटकल्यामुळे कधी कधी तुम्हाला अशा अवस्थेतून जावे लागते. महाराजाला लयीत येण्यासाठी आपल्या गोलंदाजीवर अधिक बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तो प्रचंड मेहनती असून तो स्वत:ला सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उल्लेखनिय आहे की, केशव महाराजशिवाय दक्षिण आफ्रिकेकडून पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या आनरिख नॉर्खिआही चांगलाच महागडा ठरला. त्याने २५ षटकात १०० धावा दिल्या. विशेष म्हणजे तो अजूनही आपल्या पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs south africa 2nd test here is what proteas team coach statement over spinner keshav maharaj