पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात रनमशीन बरसली! सचिन, सेहवागचा विक्रम टाकला मागे

विराट कोहली ( छाया सौजन्य बीसीसीआय ट्विटर)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानात डबल धमाका करत कोहलीने मागील चार सामन्यातील उणीव भरुन काढली. कसोटी कारकिर्दीतील कोहलीचे हे सातवे द्विशतक आहे. यापूर्वी माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी ६ द्विशतके झळकावली होती. कोहलीने या दिग्गजांचा विक्रम मागे टाकत सातवे द्विशतक झळकावले.    

IND vs SA : किंग कोहलीची रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय संघाचा कर्णधार एकदिवसीय आणि टी-२० मध्ये दमदार कामगिरी करताना दिसला. मात्र कसोटी सामन्यात कोहली बॅकफूटवर होता. यंदाच्या वर्षातील कसोटीमध्ये विराटच्या भात्यातून धमाका पाहायला मिळाला नव्हता. यापूर्वीच्या चार कसोटी सामन्यात कोहलीने ३५ च्या सरासरीने अवघ्या २१० धावा केल्या होत्या. कसोटी कारकिर्दीतील त्याची ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांक कामगिरी ठरली. 

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप : मेरी कोमची पदक निश्चिती! सुवर्ण पंचची आस

पुण्याच्या मैदानात त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करत द्विशतकी खेळी साकारली. कोहलीचे द्विशतक आणि मयंक अग्रवालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. यासोबतच विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील ७ हजार धावांतचा टप्पा पार केला. जलदगतीने हा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली चौथ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने १३८ डावात हा पल्ला गाठला आहे. त्याच्यासोबत गॅरी सोबर्स, कुमार संगकारा संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहेत. या यादीत वेली हॅमंड अव्वलस्थानी आहेत. त्यांनी १३१ डावात ७ हजार धावांचा टप्पा पार केला होता. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने १३४ डावात हा पल्ला गाठला होता. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला १३६ डावा खेळावे लागले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa 2nd Test Day 2 Captain virat kohli 7 th double ton he crossed Virender Sehwag and sachin tendulkar Record