पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विराटने रोहितचे दोन विक्रम टाकले मागे

रोहित शर्मा आणि विराट कोहली

रनमशिन विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोहालीतील दुसऱ्या टी-२० मालिकेत अर्धशतकी खेळी करुन आपल्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद केली. आफ्रिकेने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीने टी-२० कारकिर्दीतील २२ वे अर्धशतक झळकावले. 

IND vs SA T20 : भारताचा आफ्रिकेवर एकतर्फी विजय

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक अर्धशतके झळकवणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट आता अव्वलस्थानी पोहचला आहे. त्याने भारताचा उपकर्णधार रोहित शर्माच्या २१ अर्धशतकांचा विक्रम मागे टाकला. या यादीत न्यूझीलंडचा मार्टीन गप्तिल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावे १६ अर्धशतके आहेत. तर ब्रेंडम मॅक्युलम (न्यूझीलंड) आणि ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) १५ अर्धशतकांसह संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलेकेचा तिलकरत्ने दिलशान १४ अर्धशतकांसह पाचव्या स्थानावर आहे. 

विनेशने मैदान मारलं, विश्व कुस्ती स्पर्धेतील पहिलं वहिलं पदक

 याशिवाय विराट कोहलीने टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. यातही त्याने रोहित शर्माला मागे टाकले. कोहलीने टी-२० मध्ये २ हजार ४४१ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा २ हजार ४४० धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa 2nd T20I Virat Kohli break Rohit Sharma two records in a single match