पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोहालीत ढगाळ वातावरण असेल, पण शक्यता धावांचा पाऊस पडण्याची

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील धर्मशाला येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दुसरा सामना बुधवारी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी मोहालीमध्ये दाखल झाले आहेत. 

'हो मी भारतीय संघाचा प्रशिक्षक होईन पण...'

मोहालीच्या मैदानातून क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. या सामन्यावर सध्या पावसाचे कोणतेही सावट दिसत नाही.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवारी मोहालीत ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकेल. मात्र पावसाची कोणतीही शक्यता नाही. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० मालिकेत पावसाने व्यत्यय आणला होता. पहिला सामन्यात नाणेफेक देखील होऊ शकली नव्हती.

धोनीबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी स्पष्ट केली भूमिका

दुसरा सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.  वेदर फॉरकास्टच्या अंदाजानुसार, मोहालीत सामन्याच्या दिवशी जवळपास ३० डिग्री सेल्सियस इतके असेल. पासाची शक्यता केवळ ५ टक्के आहे. मोहालीची खेळपट्टीही फलंदाजांसाठी अनुकूल असल्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडल्याचे पाऊस पडू शकतो.