पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvSA Day3- एल्गर- क्विंटन डी कॉकच्या शतकानंतरही आफ्रिका पिछाडीवरच

डेन एल्गर

India vs South Africa 1st Test Match Day 3  Cricket Update: भारताने समोर ठेवलेल्या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर सलामीवीर डेन एल्गर आणि क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीने आफ्रिकेन संघाचा डाव सावरला आहे. कर्णधार फाफ ड्युप्लेसीस आणि एल्गरने ११५ धावांची भागीदारी केली. ड्युप्लेसीस १०३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५५ धावांची भर घालून तंबूत परतला. अश्विनने त्याला झेलबाद केले.    

INDvSA Day2- आफ्रिकेची आघाडी भारतीय फिरकीसमोर गडबडली

डेन एल्गर संयमी खेळी करत कसोटी कारकिर्दीतील १२ वे शतक झळकावले. आशियाई मैदानात त्याचे हे दुसरे तर भारताविरुद्धचे पहिलेच शतक आहे. दुसऱ्या दिवसाखेर ३ बाद ३९ धावांवरुन आफ्रिकेने तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु केला त्यावेळी एल्गर  २७(६३) आणि बवुमा २(७) धावांवर खेळत होते. बवुमा संघाच्या आणि आपल्या वैयक्तिक खात्यात अवघ्या १६ धावांची भर घालून परतल्यानंतर एल्गरने कर्णधाराच्या साथीने एक दमदार भागीदारी केली. लयीत खेळणाऱ्या एल्गरला जडेजाने तंबूचा रस्ता दाखवत भारताला सहावे यश मिळवून दिले. डेन एल्गरने २८७ चेंडूत १८ चौकार आणि ४ षटकारांसह १६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान क्विंटन डी कॉकने आपले पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. 

पाकच्या PM बद्दल गांगुली म्हणतो, हा क्रिकेटमधला इम्रान नव्हे

क्विंटन डी कॉकला बाद करत अश्विन भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याने १६३ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकारांसह १११ धावांची खेळी त्यानंतर मैदानात उतरलेल्या फिलेंडरला तर अश्विनने खातेही उघडू दिले नाही. तिसऱ्या दिवसाखेर आफ्रिकने ८ बाद ३८५ धावांपर्यंत मजल मारली असून मुथ्थूस्वामी १२ तर केशव महाराज ३ धावांवर खेळत आहेत. आफ्रिकेचा संघ अजूनही ११७ धावांनी पिछाडीवर आहे.
चौथ्या दिवशी उरलेल्या दोन गड्यांना लवकरात लवकर तंबूत धाडत चांगल्या आघाडीसह भारतीय संघ आपला दुसरा डाव सुरु करण्यास प्रयत्नशील असेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs South Africa 1st Test Day 3 Dean Elgar Quinton de Kock Ravichandran AshwinIndia vs South Africa 1st Test Day 3 Dean Elgar Quinton de Kock Ravichandran Ashwin