दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पहिल्यांदाच भारताच्या डावाची सुरुवात करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माने द्विशतकाची संधी गमावली. या सामन्यात तो १७६ धावांवर बाद झाला. केशव महाराजने रोहितला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची द्विशतकाची संधी हुकली असली तरी बाद होण्यापूर्वी रोहितने आपल्या नावे काही विक्रमाची नोंद केली. यात ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडम यांचा विक्रमही त्याने मागे टाकला आहे.
द्विशतकासह मयंकची सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच सलामीला आलेल्या रोहित शर्माने २४४ चेंडूत २३ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ७२.१३ च्या स्ट्राइक रेटने १७६ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने घरच्या मैदानावरील कसोटी सरासरी १०० पेक्षा अधिक झाली आहे. दहा डावानंतर रोहित शर्माने सर डॉन ब्रॅडमन यांचा घरच्या मैदानावरील कसोटीतील सर्वोच्च सरासरीचा विक्रम मागे टाकला. ब्रॅडमन यांच्या नावे घरच्या मैदानावर ९८.२२ च्या सरासरीने धावा केल्याचा विक्रम होता.
INDvSA Day2- सामन्यातील दुसऱ्या दिवसातील अपडेट्स
पहिल्या दिवसाप्रमाणेच रोहितने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला देखील चौकाराने सुरुवात केली. मयंकसोबत २१९ धावांची भागीदारी करताच या जोडीने सेहवाग-गंभीर जोडीचा १५ वर्षांचा विक्रम मागे टाकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला सर्वोच्च भागीदारी करण्याची नोंद रोहित-मयंक जोडीने आपल्या केली. या जोडीने सामन्यात ३१७ धावांची भागीदारी रचली. याशिवाय रोहित शर्मा भारतचा असा पहिला सलामीवीर ठरला ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळी साकारली आहे. सलामीवीराच्या रुपात पहिले शतक झळकवणारा रोहित चौथा भारतीय फंलदाज आहे. यापूर्वी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉने असा पराक्रम केला होता.