पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA,1st T20 : सलामीच्या सामन्यात पाऊस बॅटिंग करणार?

धर्मशाला मैदान

India vs South Africa, 1st T20 at Dharamshala: विंडीज दौऱ्यातील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना धर्मशाला स्टेडियमवर रंगणार असून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या लढतीवर पावसाचे सावट आहे.  

यापूर्वी दोन्ही संघ २०१८ मध्ये समोरासमोर आले होते. त्यावेळी भारताने ३ सामन्याच्या टी-२० मालिका २-१ अशी जिंकली होती. धर्मशाला येथे पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज  पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला आहे. त्यामुळे सामना होणार की पाऊसच बॅटिंग करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

INDvsSA, 1st T20: विराट-रोहितची 'या' विक्रमांवर असेल नजर

धर्मशाला येथील खेळपट्टी जलगती गोलंदाजांसाठी अनुकूल अशी आहे. जर पाऊस झाला आणि बरेच वेळ कव्हर्स खेळपट्टीवर राहिले तर जलदगती गोलंदाज अधिक प्रभावी मारा करताना पाहायला मिळू शकते. सामन्यापूर्वी बीसीसीआयने धर्मशाला मैदानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ढगाळ वातावरण असल्याचे स्पष्ट दिसून येते.

INDvsSA Test: विराटचा 'लाडला' बाहेर! रोहित शर्मा संघात

धर्मशालामध्ये शनिवारी दुपारी देखील पाऊस झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ सराव करुन परतल्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा केवळ १० मिनिटे नेट सराव करु शकला. पावसामुळे भारतीय संघाला इनडोअर नेट सराव करावा लागला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs south africa 1st t20i weather forecast at dharamshala rain chances in ind vs sa match team india train indoor