पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvSA: विशाखापट्टणमच्या मैदानात षटकारांची विश्वविक्रमी 'बरसात'

कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकारांची नोंद (संग्रहित छायाचित्र)

विशाखापट्टणमच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला. क्रिकेटचा सामना म्हटले की विक्रम हे समीकरण ठरलेलं आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या लढतीत एक नाही तर अनेक विक्रमांची नोंद झाली. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी मिळून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

'विराट' रुप पाहून स्टोक्सनं हिटमॅन रोहितला केलं ट्रोल

पहिल्या कसोटी  सामन्यात सर्वाधिक षटकारांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही संघांनी मिळून या सामन्यात एकूण ३७ षटकार खेचले. यापूर्वी सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघाच्या नावे होता. २०१४-१५ मध्ये शारजहाच्या मैदानात ३५ षटकार क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाले होते. या यादीत दुसऱ्या स्थानावर भारत-पाकिस्तान या संघाचा विक्रम होता. २००५-६ मध्ये या दोन्ही संघामध्ये फैसलाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात २७ गगनचुंबी षटकारांची नोंद झाली होती.   

हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, भावनिक पोस्टसह शेअर केली माहिती

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी २७ षटकाराची आतषबाजी केली. यात रोहित शर्माने १३, मयंक अग्रवालने ६ आणि रविंद्र जडेजाने ४ षटकार खेचले. तर चेतेश्वर पुजारा २,कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी प्रत्येकी एक-एक षटकार लगावला. आफ्रिकेच्या फलंदाजांनी या सामन्यात १० षटकार खेचले. यात सलामीवीर डीन एल्गर यांच्या सर्वाधिक ४ षटकारांचा समावेश असून क्विंटन डी कॉक २, फाफ ड्युप्लेसीस, मार्करम, डेन पीट आणि रबाडा यांच्या प्रत्येकी एका षटकाराचा समावेश आहे.