पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम!

उमेश यादव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात जलदगती गोलंदाज उमेश यादवने आपल्या फलंदाजीतील झलक दाखवून दिली. ज्या जॉर्ज लिंडेने भारताच्या सर्वाधिक गड्यांना तंबूत पाठवले त्या जॉर्जचा त्याने चांगलाच समाचार घेतला. रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या उमेश यादवने षटकाराने आपले खाते उघडले. त्याने लिंडेला सलग दोन षटकार खेचले. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्यानंतर तो घेऊन आलेल्या षटकात त्याने आणखी तीन षटकारांची आतषबाजी केली. अखेर जॉर्जने त्याला बाद करत ५ षटकारांचा बदला घेतला. उमेश यादवने १० चेंडूत ५ षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या.  

द्विशतकवीर रोहितच्या 'हिट' विक्रमावर एक नजर

याखेळीसह उमेश यादवच्या नावे दोन खास विक्रमांची नोंद झाली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ३०+ धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत त्याचा समावेश झाला. त्याने स्टेफन फ्लेमिंगचा ११ चेंडूतील ३१ धावांचा विक्रम मागे टाकला. फ्लेमिंगने २००४ मध्ये आफ्रिकेविरुद्धच जलद खेळी केली होती.  या यादीत विंडीजचा नाम मॅक्लिन १२ चेंडूत ३१ (दक्षिण आफ्रिका-१९९८), पाकचा अब्दुल रझाक १७ चेंडूत ४३ धावा (झिम्बाब्वे-२०११), ऑस्ट्रेलियाचा होव्हेल १५ चेंडूत ३५ धावा केल्याची नोंद आहे. 

INDvsSA Day 2 Stumps : आफ्रिका २ बाद ९ धावा, दुसरा दिवसही भारताचाच!

याशिवाय उमेश यादवने ३१० च्या स्टाइक रेटसह एक विक्रम आपल्या नावे नोंदवला. १० पेक्षा अधिक चेंडूचा सामना केल्यानंतर एखाद्या फलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही त्याने कमाल करुन दाखवली. दुसऱ्या दिवसाअखेर आफ्रिकेला त्याने सुरुवातीला धक्के देण्यात शमीला उत्तम साथ दिली. सलामीवीर डी कॉकला बाद करुन त्याने भारताला मोठे यश मिळवून दिले.