पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाची टी-२० सामन्यात अनोखी हॅटट्रिक

विराट आणि संजू सॅमसन

वेलिंग्टनच्या मैदानात सुपर ओव्हरमध्ये निकाली लागलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या चौकारासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा विजय नोंदवला. या रोमहर्षक सामन्यातील विजयाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतीय संघाने टायब्रेकनंतर सलग तिसरा सामना जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला. यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला बरोबरीत रोखून सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता. 

NZ vs IND: सुपर ओव्हरमध्ये टीम इंडिया पुन्हा ठरली सुपर हिट

२००७ च्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा सामना टाय करुन सामना जिंकण्याचा पराक्रम केला होता. साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात डर्बनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १४१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या पाक संघाला धोनी ब्रिगेडने निर्धारित २० षटकात १४१ धावांत रोखले होते. त्यावेळी सामन्याचा निकाल हा बॉल आउटच्या माध्यमातून घेण्यात आला. यात भारतीय संघाने बाजी मारली. एवढेच नाही तर भारताने विश्वचषकही जिंकला होता. 

 

BCCI सल्लागार समितीमध्ये मदनलाल, आरपीची अन् सुलक्षणाची वर्णी

न्यूझीलंड दौऱ्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दुसऱ्यांदा मॅच टाय करुन प्रतिस्पर्ध्याला पराभवाची धुळ चारली होती. या सामन्यात देखील भारताने प्रथम फंलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १७९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सनने ९५ धावांची खेळी करुन देखील यजमानांना १८० धावा करता आल्या नाही. न्यूझीलंडच्या संघाला भारताने १७९ धावात रोखले. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत भारताने मालिका खिशात घातली. 

मॅच सुपर ओव्हरमध्ये कशी न्यावी हे न्यूझीलंडकडून शिकावं!

वेलिंग्टनच्या मैदानात भारतीय संघाने तिसऱ्यांदा सामना टाय करुन मॅच आपल्या बाजूने वळवली. या सामन्यात भारताने निर्धारित २० षटकात १६५ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचा संघ हा सामना सहज जिंकणार असे वाटत असताना शार्दूलने अखेरच्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. न्यूझीलंडला निर्धारित २० षटकात १६५ धावांवरच रोखल्याने सामन्याचा निकाल पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये गेला. आणि भारताने सामना पुन्हा खिशात घातला. विशेष म्हणजे टी-२० मधील हे तिन्ही सामने भारताच्या हातून निसटले होते. मात्र भारताने गमावलेले सामने जिंकण्याची क्षमता काय असते तेच या सामन्यातून दाखवून दिले आहे.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs nz 4th t20i tim southee become most unlucky bowler in super over indian Team Make hat trick Record after match tie