पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND: टीम इंडियाचा सराव धाकधूक वाढविणारा...

हनुमा विहारी

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनच्या मैदानातून भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ  तीन दिवसांचा सराव सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजाराशिवाय बाकी भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने ९ बाद २६३ धावा केल्या आहेत. 

...अन् दादाने घेतली मास्टर ब्लास्टरची फिरकी

या सराव सामन्यात हनुमा विहारीने १०१ धावा करुन रिटायर्ड हर्ट झाला. तर चेतेश्वर पुजाराने ९३ धावांची खेळी केली. भारतीय संघातील  सात फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्येपर्यंतही पोहचू शकले नाहीत. भारतीय फलंदाजांचा फ्लॉपशो आगामी मालिकेसाठी संघासाठी धोक्याची घंटा आहे. सराव सामन्यात दोन्ही संघाच्या सहमतीनंतर भारतीय संघ  प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली.

मालकाला आला पंतचा पुळका, बाकावर बसवायला संघात घेतलय का?

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर  स्कॉटने सलामीवीर पृथ्वी शॉला माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मयांक अग्रवाल १३ चेंडूत १ धाव काढून बाद झाला. शुभमन गिल आल्यापावली माघारी फिरला. भारतीय संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे १८ धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर पुजारा आणि विहारी जोडीनं भारताचा डाव सावरला. ४ बाद ३८ धावांवरुन भारताच्या धावफलकावर त्यांनी २३३ धावा लावल्या. पुजारा ९३ धावांवर जेक गिब्सनचा शिकार ठरला. ऋषभ पंत अवघ्या ७ धावा केल्या. तर वृद्धिमान साहा ६ चेंडूत खातेही उघडता आले नाही. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs new zealand xi practice match day 1 at Seddon Park hanuma vihar hit century cheteshwar pujara scored 93 rishabh pant mayank agarwal prithvi shaw shubman gill and rest batsmen fail to impress