भारतीय क्रिकेट नियंत्रक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मर्यादित षटकातील विकेटकीपर फलंदाज लोकेश राहुलच्या कामगिरीचे मोठे कौतुक केले आहे. कसोटीतही राहुल आपला हाच फॉर्म कायम ठेवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पाच टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात विकेटकीपर ऋषभ पंतऐवजी राहुलला संघात घेत त्याच्याकडून विकेटकीपिंग करुन घेतले.
ICC U 19 World Cup : युवा टीम इंडियाने घेतला किवींचा जीव
राहुलने पहिल्या टी-२० सामन्यात आक्रमक खेळी करत ५६ धावांची खेळी केली होती. पंतऐवजी राहुलला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यावर गांगुली एबीपीला म्हणाले की, विराट कोहली हा निर्णय घेतो. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार राहुलच्या भूमिकेवर निर्णय घेतात.
Video : गडकरी-फडणवीसांच्या गोलंदाजीवर पांड्याची फटकेबाजी
गांगुली पुढे म्हणाले की, त्याने (राहुल) वनडे आणि टी-२० मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली होती. परंतु, त्यानंतर त्याची कामगिरी ढासळत गेली. मर्यादित षटकांच्या प्रकारात तो चांगली कामगिरी करत आहे. अपेक्षा आहे की, आपला हा चांगला खेळ तो पुढेही चालू ठेवेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्याबाबत सर्व निर्णय संघ व्यवस्थापनाचा आहे.
Video : रोहितचा भन्नाट झेल सोशल मीडियावर व्हायरल
यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात विकेटकीपिंगच्या स्पर्धेत कोण-कोण आहे, असा सवाल त्यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाला की, निवडसमिती, विराट आणि रवी शास्त्री याचा निर्णय घेतली. ते जो काही विचार करतील, तसेच होईल.