पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटच्या खराब कामगिरीवर इंझमाम यांनी दिली अशी प्रतिक्रिया

कोहलीच्या खेळीवर इंजमाम यांची खास प्रतिक्रिया

न्यूझीलंविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली  सपशेल अपयशी ठरला. त्याच्या खराब कामगिरीनंतर अनेक जण त्याच्यावर टीका करताना दिसत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक विराट कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यावर विराट कोहलीने ११ डावात अवघ्या २१८ धावा केल्या. कसोटी मालिकेतील चार डावात त्याने १९,२, १४ आणि ३ केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक खेळाडू हा चढ उताराच्या काळातून जात असल्याचे सांगत इंझमाम यांनी विराटची पाठराखण केली आहे.

ICC WT20 WC: सेमीफायनलसाठी भारतीय महिलांसमोरील समीकरण

इंझमाम यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विराटच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, एक क्रिकेट असल्यामुळे विराट कोहली ज्या फेजमधून जात आहे त्याची मला कल्पना आहे. तुम्ही प्रयत्न करुनही अनेकदा तुमच्या पदरी निराशा येत असते. विराटची पाठराखण करताना त्यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मोहम्मद युसूफचा दाखलाही दिला. यूसूफचा बॅकलिफ्ट खूप अप्रतिम होता. खराब फार्ममध्ये असताना तो माझ्याकडे जेव्हा आला त्यावेळी तू तुझ्या शैलीतच खेळ असे मी त्याला सांगितले होते. 

INDvSA: या ताफ्यासह आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार

ते पुढे म्हणाले की, विराटच्या खेळाच्या शैलीवर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या शैलीमध्ये बदल करण्याची विराटला गरजच नाही. तो मजबूत मानसिकता असणारा खेळाडू आहे. महान खेळाडू याच जोरावर कमबॅक करतात. विराटही पुन्हा दमदार पुनरागमन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs new zealand test series nz vs ind inzamam ul haq on virat kohli poor form watch video here