भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर दोन्ही संघ आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतील. कसोटीचा विचार केल्यास भारतीय संघासाठी न्यूझीलंडमधील मैदान खास असेच आहे. १९६८ मध्ये भारताने याठिकाणी परदेशात पहिला विजय नोंदवला होता. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ असे यश मिळवले होते.
VIDEO: गर्दीतून धोनीला बाहेर काढण्यासाठी हेअरस्टायलिस्ट झाली बॉडीगार्ड
वेलिंग्टनचे मैदान भारतीय संघाचे विद्यमान कर्णधार रवी शास्त्री यांच्यासाठी देखील खास आहे. वेलिंग्टनच्या मैदानावरुनच रवी शास्त्री यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडच्या मैदानात पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
IPL 2020 :यंदा स्पर्धेत या नव्या गोष्टी पाहायला मिळणार!
भारतीय संघ मैदानात उतरण्यापूर्वी रवी शास्त्रींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. ड्रेसिंगरुममध्ये जाण्यापूर्वी मला माझ्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या क्षणाची आठवण येत आहे. याच मैदानात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात केली होती. ३९ वर्षांनी देखील मी ड्रेसिंगरुममध्ये आहे, याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन रवी शास्त्री यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात रवी शास्त्री यांनी पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात तीन असे एकूण सहा बळी टिपले होते.