पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND: ...तर संघाचे नेतृत्व सोडेन, केनचा स्ट्रेट ड्राईव्ह!

केन विल्यमसन

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर न्यूझीलंड संघासमोर टीम इंडियाचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर केन विल्यमसनवर टीका झाली होती. त्यानंतर आता भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी त्याने संघाचे नेतृत्व सोडण्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. माझ्या नेतृत्वाचा संघाला फायदा होत नसेल तर मी संघाची जबाबदारीतून मुक्त होईल, असे त्याने म्हटले आहे. 

... म्हणून खेळापेक्षा तिच्या नेलपेंटची झाली चर्चा!

भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी केन विल्यमसनने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेतृत्व सांभाळण्यास अजूनही तयार आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने संघाचे हित साध्य होत नसेल तर नेतृत्व सोडण्याचे संकेत दिले. केन विल्यमसन म्हणाला की, संघासाठी सर्वोत्कृष्ट काय या विचारानेच मी मैदानात उतरतो. संघ हित हेच माझ्यासाठी प्राधान्य असते. त्यामुळे मी नेतृत्व सोडण्यात संघाचा फायदा असेल तर मी तेही करायला तयार आहे.  

किवींचा बदला घेण्यासंदर्भात विराटनं व्यक्त केल्या मनातल्या भावना

तो पुढे म्हणाला की, संघाला सकारात्मकतेच्या दिशेने नेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्यास तयार आहे. मागील पराभव विसरुन आगामी मालिकेला सामोरे जावे लागेल. आमच्यासमोर क्रिकेट जगतातील सर्वोत्तम संघाचे आव्हान असेल, असे सांगत त्यांनी भारतीय संघ मजबूत असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रलियाविरुद्धच्या पराभवातून खूप काही शिकायला मिळाले. यावेळी झालेल्या चुका टाळून चांगली कामगिरी करण्यास संघ उत्सुक असल्याचे केनने म्हटले आहे. भारतीय संघासमोर न्यूझीलंड संघाची घरच्या मैदानावरील कामगिरी उजवी आहे. हा रेकॉर्ड कायम राखण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल, असा विश्वासही न्यूझीलंड कर्णधाराने व्यक्त केलाय.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs new zealand t20i series Kane Williamson says ready to give up captaincy in team interest