पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ मैदानात उतरताच धोनीच्या नावे विक्रमाची नोंद

महेंद्रसिंह धोनी ( छाया सौजन्य बीसीसीआय ट्विटर अकाउंट)

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारतीय संघ मँचेस्टरच्या मैदानात उतरला आहे. न्यूझीलंडला शह देवून भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वजेतेपद मिळवण्यासाठी आगेकूच करणार का? याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच धोनीने एक नवा विक्रम आपल्या नावे केला.  

भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टिरक्षक मेहंद्रसिंह धोनीचा एकदिवसीय कारकिर्दीतील ३५० वा सामना आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर ३५० एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारा धोनी दुसरा तर क्रिकेट जगतातील तो दहावा खेळाडू आहे.  

 

#INDvsNZ: दबाव झेलेल तो फायनल खेळेल, कोहलीचा 'स्टेट ड्राइव्ह'

सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. सचिनच्या नावे ४६३ सामन्यांची नोंद आहे. त्याच्यानंतर श्रीलंकेचा महिला जयवर्धने (४४८), सनथ जयसूर्या (४४५), कुमार संगकारा (४०४), पाकिस्तानचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (३९८) इंजमाम उल हक (३७८), ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (३७५), पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम आक्रम (३५६) आणि श्रीलंकन मुथय्या मुरलीधरन (३५०) या खेळाडूंची वर्णी लागते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs new zealand semi final world cup 2019 ms dhoni script history become first to huge world record