पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो!

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिला दिवस गाजवला

वेलिंग्टनच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी किवी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. सलामीवीर पृथ्वी शॉ १६, मयांक अग्रवाल ८४ चेंडूत ३४ धावा, मैदानात नांगर टाकण्याची क्षमता असलेला चेतेश्वर पुजारा ४२ चेंडूत ११ आणि कर्णधार विराट कोहली ७ चेंडूत अवघ्या दोन धावा करुन तंबूत परतले. अष्टपैलु हनुमा विहारीच्या रुपात भारताला न्यूझीलंडने पाचवा धक्का दिला. परिणामी पहिल्या दिवशी ५५ षटकांच्या खेळात भारतीय संघाला ५ बाद १२२ धावांपर्यंत मजल मारता आली. पावसामुळे दिवसभरातील उर्वरित षटकांचा खेळ होऊ शकला. 

कलम ३७०: J&K बोर्डाने असा केला रणजी संघातील खेळाडूंना संपर्क

उप-कर्णधार अजिंक्य रहाणे १२२ चेंडूत ३८ धावा करुन मैदानात असून दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत ३७ चेंडूत १० धावांवर नाबात खेळत होता. सहाव्या विकेटसाठी भक्कम भागीदारी रचत डाव सावरण्याची मोठी जबाबदारी या जोडीवर आहे. ऋषभ पंतसाठी टीकाकारांना बॅटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची ही एक चांगली संधी असून त्याचे तो सोने करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

NZvsIND: कसोटी सामन्यापूर्व शास्त्रींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

न्यूझीलंडकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पणात लक्षवेधी गोलंदाजी करणाऱ्या कायले जेमिसनने कसोटी पदार्पणातही जोरदार सुरुवात केली आहे. भारताच्या तीन गड्यांना त्याने तंबत धाडले. पुजारा, कोहली आणि विहारीची त्याने शिकार केली.  साऊथी आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs New Zealand score 1st Test Rain washes out final session India 122 5 at stumps on Day 1