पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : रोहितचा भन्नाट झेल सोशल मीडियावर व्हायरल

रोहित शर्मा

 ऑकलंडच्या मैदानात प्रथम फलंदाजाला मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड सलामीवीरांनी भारताच्या प्रमुख गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. गप्टिल-मुन्रोची धुवांधार फलंदाजी सुरु असताना शिवम दुबेने टीम इंडियाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. जबरदस्त फलंदाजी करत असलेल्या मार्टिन गप्टिलचा रोहित शर्माने  सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपला.

NZ vs IND 1st T20: पहिल्या टी-२० सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

रोहितने सीमारेषेवर टिपलेल्या झेलची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्याने घेतलेला झेल हा क्रिकेटच्या मैदानातील अप्रतिम झेलपैकी एक असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. गप्टिल आणि मुन्रो या सलामीवीरांनी ७.५ षटकांत ८० धावांची आक्रमक भागिदारी होती. ही जोडी भारताच्या प्रमुख गोलंदाजांचा समाचार घेत असताना रोहितने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवत गप्टिलला तंबूत धाडले. क्षेत्ररक्षणात अप्रतिम नजराणा दाखवून दिलेल्या रोहित शर्मा  फलंदाजीमध्ये अपयशी ठरला. सँटनरने अवघ्या ७ धावांवर त्याला तंबूत धाडले. रॉस टेलरने रोहितचा झेल टिपला. 

NZvsIND: ...तर संघाचे नेतृत्व सोडेन, केनचा स्ट्रेट ड्राईव्ह!

न्यूझीलंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार खेळ करत निर्धारित २० षटकात ५ बाद २०३ धावा करत भारतासमोर २०४ धावांचे आव्हान ठेवले आहे. दोन्ही संघ पहिला सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs New Zealand Rohit Sharmas stunning catch at boundary ropes leaves Auckland crowd in awe WATCH