पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सामना गमावला पण भावनिक ट्विटनं श्रेयसनं मन जिंकली!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अय्यरने शतक केले होते.

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकावर अनुभवी रॉस टेलरची नाबाद शतकी खेळी भारी ठरली. भारताविरुद्धच्या सामन्यातील मैदानातील खेळीनं टेलर बॉस ठरला असला तरी ट्विटरवरच्या शाब्दिक खेळीनं युवा फलंदाज श्रेयस अय्यर 'हार के जीतनेवाला बाजीगर' ठरलाय. 

एमएसके प्रसाद यांनी रायडूबद्दल बाळगलेले मौन अखेर सोडले

भारतीय संघाच्या पराभवानंतर श्रेयसने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या खेळीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सामन्याचा निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याप्रमाणे लागला नाही. पण देशासाठी पहिले शतक साजरे करण्याचा क्षण  खास असाच होता. जेव्हा मी बॅट हातात घेतली तेव्हापासून मी या क्षणाचे स्वप्न पाहिले होते, असे ट्विट श्रेयस अय्यरने केले आहे. संघात संधी दिल्याबद्दल त्याने संघ व्यवस्थापनाचेही आभार मानले आहेत. श्रेयस अय्यरने केलेल्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. श्रेयस अय्यरची शतकी खेळी टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकली नसली तरी त्याच्या ट्विटने क्रीडा चाहत्यांची मने जिंकली आहेत.  

NZvsIND : टेलरचा शतकी ट्रेलर! वनडेत किवींच्या जिवात जीव...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यत २ बाद ५४ धावा अशी बिकट अवस्था असताना श्रेयस अय्यर मैदानात आला होता. विराट कोहलीच्या साथीने त्याने भारताच्या डावाला आकार दिला. कोहली बाद झाल्यानंतरही त्याने आपली खेळी कायम ठेवत एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक झळकावलं. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ३४७ धावांपर्यंत मजल मारली होती. पण रॉस टेलरने नाबाद शतकी खेळी करत भारतीय संघाला ४ गड्यांनी नमवत तीन सामन्यांच्या मालिकेत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs new zealand odi series nz vs ind 1st odi match at seddon park hamilton shreyas iyer tweet is going viral