भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलग तीन पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ आता एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला रोखण्याच्या तयारीला लागला आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. तीन सामन्यांच्या आगामी मालिकेसाठी ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हॅन्री यांना संघात स्थान मिळालेले नाही. दुखापतीमुळे हे तिन्ही खेळाडू संघाचा भाग नसल्यामुळे टी-२० प्रमाणेच एकदिवसीय मालिका ही यजमान न्यूझीलंडसाठीच खडतर असणार आहे.
Video : आकाशला कोना मारणाऱ्या सॅमला आयसीसीचा दणका
प्रमुख तीन गोलंदाजांच्या अनुपस्थितीत कायल जॅमिसनला पहिल्यांदा संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासह स्कॉट कुगेलजिन आणि हाशिम बेनेट यांचीही एकदिवसीय संघात वर्णी लागली आहे. या दोघांनी २०१७ मध्ये आयर्लंडमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अंगठ्याच्या दुखापतीमूळ संघाबाहेर पडलेल्या टॉम लॅथमला संघात स्थान मिळाले आहे.
VIDEO : न्यूझीलंडच्या चाहत्याकडून 'भारत माता की जय'ची घोषणा
२०१९ च्या विश्वचषकानंतर न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हॅमिल्टनच्या मैदानात रंगणार आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला होता. या खेळीची पुनरावृत्ती करण्यासाठी न्यूझीलंड प्रयत्नशील असेल. दुसरीकडे पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने यजमानांना बॅकफूटवर टाकत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ही पुनरावृत्ती करण्यासाठी विराट सेना उतावळी असेल.
न्यूझीलंड वनडे टीम:
केन विल्यम्सन (कर्णधार), हाशिम बेनेट, टॉम ब्लेंडल, कॉलिन डि ग्रँडहोम, मार्टिन गप्तिल, कायल जॅमिसन, स्कॉट कुगेलजिन, टॉम लॅथम, जिम्मी नीशम, हेन्री निकोलस, मिशेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, रॉस टेलर.
भारत की वनडे टीम:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, केदार जाधव.