न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले. मालिकेतील दुसरा सामना २९ फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्चच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुसऱ्या सामन्यासाठी संघ सकारात्मकतेनेच मैदानात उतरेल, असे विराट कोहलीने म्हटले आहे.
दीप्ती-वेदाचा हा फोटो शेअर केल्यानं भारतीय चाहते ICC वर भडकले
पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. पहिल्या डावात १६५ आणि दुसऱ्या डावात १९१ धावा केल्या होत्या. केवळ एकट्या सलामीवीर मयांक अग्रवालला पन्नाशी गाठता आली होती. विराट कोहली पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात १९ धावांवर बाद झाला होता. कोहली म्हणाला की, वेलिंग्टनच्या सामन्यात काय झाले ते आम्ही डोक्यात ठेवणार नाही. या सामन्यात आम्ही सकारात्मक विचाराने मैदानात उतरेन. किवी गोलंदाजावर दबाव निर्माण करण्यावर आम्ही भर देऊ. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून भारतीय संघाचा हा पहिला पराभव होता.
भारताचा मोठा विजय! अखेर राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचा समावेश
तो पुढे म्हणाला, पराभवामुळे जिंकण्याचा विश्वास हरवता कामा नये. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताच सामना सोपा नसतो. प्रतिस्पर्धी देखील तुम्हाला पराभूत करण्यासाठीच मैदानात उतरलेला असतो. याचा आपण स्वीकार करायला हवा.
भारतीय संघ २०१६ पासून सातत्यपूर्ण चांगली काम करत कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचला आहे. सकारात्मकतेमुळे संघाला हे शक्य झाले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने आम्ही दुसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरु. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने ढासळलेलो नाही. आम्ही मागे हटणार नाही, असे सांगत दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करु, असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे.