पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: जेव्हा राहुल-मनीष मॅचदरम्यान एकमेकांशी कन्नडमध्ये बोलतात...

जेव्हा राहुल-मनीष मॅचदरम्यान एकमेकांशी कन्नडमध्ये बोलतात...

महाराष्ट्र किंवा मुंबईतील खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाकडून खेळत असतात. तेव्हा अनेकवेळा हे खेळाडू एकमेकांशी मराठीतून संवाद साधताना दिसले. आता ही क्रीडा रसिकांना मैदानावर हा प्रसंग पाहता आला. पण तो मराठीऐवजी कन्नडमध्ये होता. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कर्नाटकचे दोन खेळाडू लोकेश राहुल आणि मनीष पांडे फलंदाजी करत होते. त्यावेळी दोघांनी कन्नडमध्ये एकमेकांशी संवाद साधला. दोघांच्या कानडी संभाषणामुळे चाहते मात्र खूश झाल्याचे दिसले. माऊंट मोनगानुई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मोक्याच्या वेळी स्टम्पला लावण्यात आलेल्या माइकच्या माध्यमातून राहुल आणि पांडे यांच्यातील संवादाचे प्रसारण झाले. भारताने हा सामना गमावला होता. 

पांड्यानं सराव तर सरु केला, पण... कमबॅक कधी?

सामन्यादरम्यान 'बरतीरा' (तु येणार आहेस का), 'ओडी ओडी बा' (पळ), 'भ्याडा भ्याडा' (नको नको) आणी 'बा बा' (ये-ये) सारखे शब्द दोघांच्या संवादात होते. त्यांचा संवाद ऐकून जगभरातील क्रिकेट चाहते खूश झाले. या सामन्यात राहुलने ११२ तर पांडेने ४२ धावांची खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. दोघांच्या फलंदाजीमुळे टीम इंडियाला २९६ धावा करण्यात यश आले होते. 

मनीष पांडेने आपले शालेय शिक्षण बंगळुरुमध्ये पूर्ण केले आहे. तर राहुलचे कुटुंबीय तुमकूरला राहतात. राहुलने नंतर आपले उच्च शिक्षण जैन विद्यापीठातून पूर्ण केले. न्यूझीलंडने तिसऱ्या वनडेत भारताला पाच विकेटने पराभूत करुन मालिकेत ३-० असा विजय मिळवला.

NZvsIND: नंबर वन बुमराहच्या नावे नकोसा विक्रम!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs new zealand manish pandey kl rahul conversation in kannada watch cricket viral video ind vs nz