पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvIND: न्यूझीलंड जिंकता जिंकता पुन्हा हरले, टीम इंडियाचा ऐतिहासिक 'पंच'

भारतीय संघाचा विजय

टी-२० मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाइट वॉश केले. अखेरच्या सामन्यात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडला ७ धावांनी पराभूत केले. आघाडीची फळी कोलमडल्यानंतर सेफर्ट-टेलर जोडीने न्यूझीलंडला सामन्यात आणले. मात्र हे दोघे अर्धशतकी खेळी करुन तंबूत परतल्यानंतर टीम इंडियाने पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या तोंडचा घास हिसकावून घेत मालिकेचा शेवट गोड केला. न्यूझीलंडमधील भारतीय संघाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

NZvsIND: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या बाहेर

रोहित शर्मा (६० धावा, जायबंदी), केएल राहुल (४५) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ३०) धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत १६३ धावा केल्या होत्या. सलामीला आलेल्या संजू सॅमसनला या सामन्यातही चमक दाखवता आली नाही. तो २ धावसंख्येवर बाद झाला. रोहित शर्मा ६० धावांवर असताना जायबंदी झाल्याने त्याने मैदान सोडणे पसंत केले. शिवम दुबेही लवकर बाद झाला. भारत मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. परंतु, १६३ पर्यंतच संघाची धावसंख्या मर्यादित राहिली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याला दुखापत झाल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व लोकेश राहुलने केल्याचे पाहायला मिळाले. 

Australian Open: अमेरिकेची नवी क्वीन ऑस्ट्रेलिन ओपनची विजेती

भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मार्टिन गप्टिल पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. बुमराहच्या षटकात अवघ्या २ धावांवर त्याला माघारी परतावे लागले. पंचांनी पायचित दिल्यानंतर न्यूझीलंडने रिव्ह्यू घेतला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकला असता. मुन्रोच्या रुपात वाशिंग्टनने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ब्रूसला लोकेश राहुल आणि संजू सॅमसनने धावबाद केले. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर सेफर्ट-टेलर जोडीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९९ धावांची खेळी केली. नवदीप सैनीने सेफर्टला (५०) आणि टेलरला ५३ धावांवर बाद केले. याशिवाय अन्य खेळांडूना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेणं जमलं नाही. परिणामी न्यूझीलंडचा संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारु शकला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India vs New Zealand India script record with historic 5 0 series win against New Zealand