पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

पृथ्वी शॉला यावेळी संघात संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे यावेळी संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. तर शुभमन गिल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. ईशांत शर्माचाही संघात समावेश करण्यात आला आहे. पण तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नवदीप सैनी याचा समावेश हे सुद्धा नव्या संघ निवडीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

असा आहे भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), मयांक आगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक राहणे (उप कर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान  साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा

फ्लॅट देतो सांगत १५ जणांची ५२ लाखांची फसवणूक, बिल्डरला अटक

नव्या संघामध्ये सलामीवीर म्हणून भारताकडे आता तीन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये मयांक आगरवाल, पृथ्वी शॉ आणि शुभमन गील यांचा समावेश होतो. यापैकी कोणते दोघे जण सलामीला पाठवले जातात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

गेल्यावर्षी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेल्या कुलदीप यादवचा यावेळी समावेश करण्यात आलेला नाही. त्याचवेळी रिषभ पंतला पुन्हा संधी देण्यात आली आहे.

.. म्हणून दिल्लीत भाजपने मुस्लिम समाजातील एकालाही उमेदवारी दिली नाही