पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहित जैसा 'विसराळू' कोई नहीं!

विराट कोहली आणि रोहित शर्मा

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने टी-२० मालिकेतील तीन सामन्यातील विजयासह ५ सामन्यांची मालिका खिशात घातली. हॅमिल्टनच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात हिटमॅन रोहितनं यजमानांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यातही रोहितने आपल्या खेळीत संयम आणि आक्रमकपणाचा संगम दाखवून दिला. टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी या तिन्ही प्रकारात सुरुवातीला वेळ घेत नंतर पिकअप घेणं हे रोहितच्या खेळीचं वैशिष्ट सुपर ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. एवढचं नाही तर त्याच्या विसराळूपणाचा किस्साही ऐकायला मिळाला.

NZ vs IND 4th T20I: सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

रोहितसारखा विसराळू व्यक्ती मी पाहिलेली नाही, असे खुद्द भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गौरव कपूरच्या कार्यक्रमात सांगितले होते. आयपॉड, वॉलेट, मोबाईल या दैनंदिन गोष्टीच नव्हे तर रोहित शर्मा आपला पासपोर्ट विसरल्याच्या घटनेचा विराट कोहली साक्षीदार आहे. वस्तू सापडली नाही तर 'डोन्ट केअर नया ले लेंगे' असं जेव्हा रोहित म्हणतो,  तेव्हा तो ती वस्तू विसरुन आलाय समजायचे असा किस्सा विराटने सांगितला होता. तुम्हाला माहीत नसेल पण एखाद्या दौऱ्यावर निघण्यासाठी भारतीय संघाचा ताफा बसमधून जेव्हा  एअरपोर्टच्या दिशेने निघतो तेव्हा रोहितने बॅट आणि पासपोर्ट घेतलाय का? याची खात्री केली जाते.

अभिमानास्पद! राणी ठरली 'अ‍ॅथलेट ऑफ द इयर २०१९' पुरस्काराची मानकरी

रोहितच्या विसराळूपणाचा किस्सा आठवण्याचं कारण न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील सुपर ओव्हरपूर्वी ड्रेसिंगरुममध्ये वातावरण चांगलच तापलं होते. एकदा बॅटिंग केल्यावर पुन्हा पॅड बांधावे लागेल याची रोहितनेच नाही तर कुणीच कल्पना केली नव्हती. पण शमीने केन विल्यम्सला माघारी धाडत सामना सुपर ओव्हरमध्ये आणला. विल्यम्सन-गप्टिल जोडीनं बुमराहच्या षटकात १७ धावा कुटत भारतासमोर १८ धावांचे लक्ष्य ठेवले.

युरोपीयन फूटबॉल क्लबसोबत करारबद्ध होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

भारताकडून रोहित-राहुल जोडी मैदानात उतरणार हे फिक्स होतं. पण तत्पूर्वी विराटचं टेन्शन वाढलं होते. कारण रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटिंग करुन आल्यावर आपलं पॅकअप केलं होतं. पुन्हा मैदानात उतरण्याची वेळ आल्यावर त्याला अ‍ॅबडोमन गार्ड काही सापडत नव्हते. गार्ड कुठे ठेवलंय हे आठवत नसल्यामुळे मी खेळायला येणार नव्हतो. माझ्या ऐवजी श्रेयसला फलंदाजी पाठवण्याबाबत विराटशी बोललो होतो, असे सामन्यानंतर रोहितने सांगितले होते. पण पाच मिनिटानंतर अखेर गार्ड सापडले आणि विराटच्या जीवात जीव आला. सुपर ओव्हरमध्ये खेळावे हे किती महत्त्वाचे होते, हे देखील निकालानंतर सिद्ध झाले.    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs New Zealand forgetful forgetful Rohit Sharma spent five minutes searching for abdomen guard before Super