पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND : ३१ वर्षांनंतर भारतावर व्हाईट वॉशची नामुष्की!

न्यूझीलंडकडून भारत क्लीन स्वीप

माउंट मैंगनुईच्या बे ओवलच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवत न्यूझीलंडने टी-२० मालिकेतील पराभवाची परतफेड केली आहे. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीप देत टी-२० मालिकेतील क्लीन स्वीपचा हिशोब चुकता केलाय. मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलची दमदार भागीदारी आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दिलेल्या २९६ धावांचे आव्हान ५ गडी राखून सहज पार केले.  ३१ वर्षानंतर भारतीय संघावर तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश होण्याची वेळ आली आहे. यापूर्वी १९८९ मध्ये भारताने वेस्टइंडिज विरुद्ध अशा प्रकारे पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती.

फायनलमधील राडा भोवला! बांगलादेशी खेळाडूंसह भारताच्या दोघांवर कारवाई

भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल (६६) आणि हेन्री निकोलस (८०) यांनी १०६ धावांची शतकी खेळी केली. केन विल्यम्सन (२२), रॉस टेलर (१२), जेम्स (१९) धावा करुन परतल्यानंतर यष्टिरक्षक टॉम लॅथम नाबाद ३२ आणि कॉलिन डी ग्रँडहोमने नाबाद ५८ धावांची खेळी करत ४७.१ षटकात ५ बाद ३०० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.  

NZvsIND 3rd ODI: सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालने भारताच्या डावाला सुरुवात केली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून एकदिवसीय पदार्पण करणारा मयांक पुन्हा अपयशी ठरला. तो अवघ्या १ धावेची भर घालून माघारी फिरला. त्यानंतर पृथ्वीच्या भात्यातून काही फटके पाहायला मिळाले. तो मोठी खेळी करेल असे वाटत असताना जेमिनसनने त्याला ४० धावांवर बाद केले. कर्णधार विराट कोहली अवघ्या ९ धावा करुन बाद झाला.

U-19 WC : बहिणीच्या निधनानंतर अकबरनं ती मॅच विनिंग खेळी केली

मध्यफळीतील युवा फंलदाज श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयस अय्यरने आणखी एक अर्धशतक साजरे करत संघाच्या धावसंख्येत ६२ धावांची भर घातली. तो बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने  मनिष पांडेसोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. लोकेश राहुलने  ११३ चेंडूत ९ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने  ११२ धावा केल्या. मनिष पांडेने ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मध्यफळीतील फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद २९६ धावांपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडने भारताला ५ गडी राखून पराभूत केले आहे. तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकत न्यूझीलंडने टी-२० मालिकेतील क्लीन स्वीपचा बदला घेतला आहे.