पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्यूझीलंड दौऱ्यावर 'रनमशिन' बिघडली!

विराट कोहली

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ पहिल्या कसोटीत संकटात सापडला आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत एकहाती विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिका गमवावी लागली. त्यानंतर आता कसोटी मालिकेत भारतीय संघ बॅकफूटवर दिसत आहे. आघाडीच्या फलंदाजासह कर्णधार विराट कोहलीच्या भात्यातून धावा निघत नसल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.  

NZ vs IND 1st Test Day 3 : मयांकचं अर्धशतक, आता मदार अंजिक्य-हनुमावर

न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहलीकडून अपेक्षित खेळी झालेली नाही. टी-२० मालिकेपासून ते पहिल्या कसोटीतील दोन डावापर्यंत कोहलीने ९ डावात केवळ २०१ धावा केल्या आहेत. यात एकदिवसीय मालिकेतील एका अर्धशतकाचा समावेश आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ५१ धावांची खेळी केली होती. चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. 

या क्रिकेटरला पाकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत विराट कोहली चार सामन्यात मैदानात उतरला. यात त्याने ४५, ११,३८ आणि ११ अशा धावा केल्या. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ५१ धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो १५ आणि ९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर आता त्याने पहिल्या कसोटीमध्येही चाहत्यांची निराशा केली. पहिल्या डावात २ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात त्याला १९ धावांपर्यंतच मजल मारता आली.

NZvsIND: कसोटी सामन्यापूर्व शास्त्रींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा 

यापूर्वी विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात घरच्या मैदानावर १३२ धावांची खेळी केली होती. २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याने ५९३ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने यावेळी मालिका १-४ अशी गमावली होती. इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहलीने परदेशी मैदानावर १४ डावात केवळ एक शतक झळकावले आहे. इंग्लंडच्या दौऱ्यानंतर विराटने ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३८ च्या सरासरीने अवघ्या ४१८ धावा केल्या आहेत. यात पर्थमधील १२३ धावांच्या एका शतकाचा समावेश आहे. दोन वर्षांतील परदेशी मैदानातील त्याची ही सर्वोच्च खेळी आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs New Zealand 9 innings 201 runs one 50 Virat Kohlis lean patch dents Indias prospects