पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्कआऊटदरम्यान विराट कोहलीने केला स्टंट, पाहा VIDEO

विराट कोहली

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑकलंडमधील ईडन पार्कमध्ये खेळल्या गेलेले पहिले दोन्ही टी-२० सामन्यांत भारताने शानदार विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना हॅमिल्टनमधील सेडेन पार्कमध्ये बुधवारी (दि.२९) खेळला जाणार आहे. तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल. टीम यासाठी भरपूर कष्ट घेत आहे. कर्णधार विराट कोहली तर जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघ निर्दयी बनत चाललाय

विराट कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आपल्या वर्कआऊटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो वर्कआऊटबरोबरच एक स्टंट करतानाही दिसत आहे. फिटनेसबाबत विराट कमालीचा जागरुक आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी तो कठीण वर्कआऊट करतो. त्याचबरोबर दुसऱ्यांनाही फिट राहण्यासाठी प्रोत्साहनही देतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Putting in the work shouldn't be a choice, it should be a requirement to get better. #keeppushingyourself

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत विराट कोहली २ वेगवेगळे वर्कआऊट करताना दिसतोय. पहिल्या वर्कआऊटदरम्यान विराट कोहलीने स्टंटही केला. विराट जमिनीवरुन एका बॉक्सवर उडी मारताना दिसतो. विराटच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत. हरभजनसिंगनेही विराटच्या या स्टंटचे कौतुक केले आहे. 

IPLची फायनल मुंबईत, सामन्याच्या वेळेतही बदल नाहीः सौरव गांगुली

दरम्यान, पाच सामन्यांची टी-२० मालिका, ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेतील तीन सामने ५ फेब्रुवारी, ८ फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर २१ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. ही कसोटी मालिका आयसीसी विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिपचा हिस्सा असेल.

रवींद्र जडेजाने मांजरेकरला केले ट्रोल, मिळाले हे उत्तर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs new zealand 3rd t20i virat kohli shares workout video with amazing stunt watch video ind vs nz hamilton seddon park