भारताचा न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट निराशाजनक ठरला. ख्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताचा सात गड्यांनी विजय मिळवला. न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. केवळ तीन गड्यांच्या बदल्यात त्यांनी या धावा पूर्ण केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने २ आणि उमेश यादवने एक विकेट घेतली. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्वतःही गोलंदाजी केली. मात्र, त्याला यश मिळाले नाही.
India vs New Zealand 2nd Test: New Zealand beat India by 7 wickets; wins series 2-0. #NZvsIND
— ANI (@ANI) March 2, 2020
न्यूझीलंडकडून सलामीची जोडी टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेलने शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावा केल्या. लॅथम बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने ७४ चेंडूवर ५२ धावा केल्या. कर्णधार केन विल्यिमसननेही पाच धावा काढून बाद झाला. बुमराहच्या शॉर्ट चेंडूवर उडालेला त्याचा झेल रहाणेने टिपला. टॉम ब्लंडेलचा त्रिफळा उडवत बुमराहने भारताला तिसरे यश मिळवून दिले.
'त्या' काळी फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते : राज ठाकरे
भारताने आपल्या पहिल्या डावात २४२ धावा केल्या होत्या तर न्यूझीलंडचा संघ २३५ धावांवर आटोपला होता. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात सात धावांची आघाडी मिळाली होती. तत्पूर्वी दिवसाची सुरुवातीला ६ विकेटवर ९० धावा करणारा भारताचा संघ त्यात अवघ्या ३४ धावांची भर घालून तंबूत परतला.
ममता दीदींनी राज्यात दंगल घडवून आणली : अमित शहा
संघाच्या ९७ धावा असताना हनुमा विहारीला (९) टीम साऊदीने बाद केले. त्याच धावसंख्येवर ट्रेंट बोल्टने ऋषभ पंतला तंबूत पाठवले. पंतने चार धावा केल्या. साऊदीने पुन्हा मोहम्मद शमीला १०९ धावसंख्येवर बाद करत टीम इंडियाला नववा धक्का दिला. बोल्ट आणि कर्णधार केन विलिम्सनच्या जोडीने जसप्रीत बुमराहला धावबाद करुन पाहुण्यांचा संपूर्ण संघ बाद केला. रवींद्र जडेजा १६ धावांवर नाबाद राहिला. बोल्टने ४ विकेट घेतल्या. साऊदीला ३ तर कॉलिन डी ग्रँडहोम आणि नील वेग्नरच्या खात्यावर १-१ विकेटची भर पडली.