पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsNZ: फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, दुसऱ्या डावातही निम्मा संघ तंबूत

भारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, दुसऱ्या डावातही निम्मा संघ तंबूत

मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने रविवारी दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला पहिल्या डावात २३५ धावांतच गुंडाळले. परंतु, दुसऱ्या डावातही पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. पहिल्या डावाच्या आधारावर सात धावांची आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ९० धावांवर सहा गडी गमावले आहेत. भारताला एकूण ९७ धावांची आघाडी मिळाली आहे. दिवसाचा खेळ संपताना हनुमा विहारी पाच तर ऋषभ पंत एका धावेवर खेळत होता. 

दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टचा (१३ धावांवर ३ विकेट) चेंडू चांगला स्विंग करत होता. त्याने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले होते. टीम साऊदी (२० धावांवर १ विकेट), नील वॅगनर (१८ धावांवर १ विकेट) आणि कॉलिन डि ग्रँडहोम (३ धावांवर १ विकेट) यांनीही बोल्टला चांगली साथ दिली. हेगली ओव्हलवरील दुसरा दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. यामध्ये २६२ धावांवर १६ विकेट पडल्या. न्यूझीलंडने आपले १० गडी तर भारताने ६ विकेट गमावल्या.

इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत? अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

तत्पूर्वी, शमी (८१ धावांवर ४ विकेट), बुमराह (६२ धावांवर ३ विकेट) आणि रवींद्र जडेजा (२२ धावांवर २ विकेट) यांच्या धारधार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात २३५ धावांवर आटोपला. सलामीवीर लॅथमने सर्वाधिक ५२ धावा तर जॅमीसनने ४९ धावा केल्या. 

हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहिन बागेत जमावबंदी, बंदोबस्तात वाढ

दुसऱ्या डावातही भारताने खराब सुरुवात केली. बोल्टने आपल्या दुसऱ्या षटकांत मयंक अग्रवालला (३) पायचीत केले. पृथ्वी शॉही १४ धावा करुन साऊदीच्या बाऊन्सरवर सोपा झेल देऊन परतला. कर्णधार विराट कोहली (१४) पुन्हा एकदा अपयशी ठरला. साऊदीला चौकार मारुन खाते उघडल्यानंतर कोहलीने जॅमीसनलाहा दोन चौकार लगावले. परंतु, ग्रँडहोमच्या सरळ येणारा चेंडू त्याला खेळता आला नाही आणि तो पायचित झाला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs New Zealand 2nd Test Day 2 as it happened Boult leads the way India 90 6 at stumps lead by 97 runs