न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार खेळ दाखवला असला तरी आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार विराट कोहलीचा फ्लॉप शो दुसऱ्या डावातही कायम राहिला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ६ विकेट्स गमावून ९७ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर भाष्य केले. विराट कोहलीसारख्या फलंदाजाला दबावात पाहणे आनंददायी होते, असे बोल्टने म्हटले आहे.
INDvsNZ: फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, दुसऱ्या डावातही निम्मा संघ तंबूत
दुसऱ्या डावात बोल्टने १२ धावा खर्च करुन भारताच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. परिणामी भारताला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ६ बाद ९० धावांपर्यंतच मजल मारता आली. यजामन न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी विराट कोहलीच्या खेळीवर लगाम लावण्यात यश मिळवले आहे. कसोटीचा विचार केल्यास ४ डावात विराट कोहलीने अवघ्या २० धावा केल्या आहेत. यावर बोल्ट म्हणाला की, विराट कोहली क्रिकेट जगतातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे यात कोणतीच शंका नाही. त्याच्याविरोधात संघाने एक प्लॅन आखला होता. त्याला मोठे फटकेबाजीपासून रोखून दबावात आणण्याचा आमचा गेम प्लॅन होता. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्याला दबावात खेळताना चूका करताना पाहणे आनंददायी वाटले, असेही बोल्टने म्हटले आहे.
NZvsIND 2nd Test Day 1: टीम इंडियाचं पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या..' रडगाणं!
स्विंग गोलंदाजीवर भारतीय संघातील फलंदाज अडचणींचा सामना करताना पाहायला मिळाले. यावर बोल्ट म्हणाला की, भारतीय खेळपट्टीवर चेंडू अधिक उसळी घेत नाही तसेच चेडूंची गतीही कमी असते. भारतीय फलंदाज मायदेशापेक्षा विपरित परिस्थितीत खेळत आहेत. त्यामुळे ते अडचणीत दिसतात, असेही बोल्टने सांगितले. मी जेव्हा भारतात जाईन तेव्हा मला देखील अडचणींचा सामना करावा लागेल, असेही सांगायलाही बोल्ट विसरला नाही.