पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND 2nd Test Day 1: टीम इंडियाचं पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या..' रडगाणं!

भारत विरुद्ध न्यूझीलंड

कसोटी मालिकेत आघाडी घेतलेल्या यजमान न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला बॅकफूटवर ठेवलं. कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताचा पहिला डाव २४२ धावांत आटोपत आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थक ठरवला. त्यानंतर किवी सलामवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टॉम लॅथम (२७) आणि टॉम ब्लेण्डल (२९) यांनी धावफलकावर बिन बाद ६३ धावा लावल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या डावात केलेल्या धावांची बरोबरी करण्यासाठी न्यूझीलंडला १७९ धावांची गरज आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज कमाल दाखविणार की न्यझीलंड फलंदाज त्यांना टक्कर देत आणखी वाईट स्थितीत घेऊन जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

ICC WT20 WC: शेफालीचं पहिले अर्धशतक हुकलं; तरीही भारताचा विजयी चौकार

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून सलामीवीर  पृथ्वी शॉ (५४), चेतेश्वर  पुजारा (५४) आणि हनुमा  विहारी (५५) या तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला पहिल्या डावात २०० धावांचा टप्पा गाठता आला. पहिल्या कसोटीत भारतीय संघाली दोन्ही डावात दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नव्हता. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या पृथ्वीने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्ध शतक झळकावले. कर्णधार विराट कोहलीसह अन्य आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. 

सलामीवीर  मयांकला  बोल्टने  अवघ्या ७ धावांवर माघारी धाडले. विराट कोहली पुन्हा  अपयशी ठरला. साऊथीनं त्याला ३ धावांवर बाद केले. उप कर्णधार रहाणेनं संघाच्या धासंख्येत ७ धावांची भर घातली. जडेजा (९) धावा करून परतल्यानंतर उमेश यादवला खातेही  उघडता आले नाही. या पाच जणांना वैयक्तिक दोन अंकी धावसंख्याही करता आली नाही. पंतने यांना मारे टाकले पण तोही अवघ्या १२ धावावरच थांबला.शमी-बुमराहने दहाव्या विकेटसाठी २२ धावा करत संघाचा पहिला डाव २४२ धावांपर्यंत  पोहचवला. कायले जेमिमसनने न्यूझीलंडकडून सर्वाधिक ५ बळी टिपले. साऊथी-बोल्टने प्रत्येकी  दोन तर वॅगनरने एक बळी मिळवला.

कोरोनामुळे या नेमबाजांसमोर भारतातील 'वर्ल्ड कप'ला मुकण्याची चिंता