पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND:..म्हणून कोचवर आली फिल्डिंग करण्याची वेळ

फिल्डिंगसाठी चक्क कोच मैदानात

ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत न्यूझीलंडने मालिका खिशात घातली. या सामन्यात एक अजब गजब प्रकार पाहायला मिळाला. खेळाडूला दुखापत झाल्यानंतर चक्क सहाय्यक प्रशिक्षक क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. 

Video : ऑस्ट्रेलियन महिलांच्या गोलंदाजीवर सचिनची फटकेबाजी

न्यूझीलंडच्या संघावर सध्या दुखापतीचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. कर्णधार केन विल्यम्स खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्यात राखीव खेळाडूच्या आजारामुळे न्यूझीलंडचे संकट आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. ३७ व्या षटकात मिशेल सँटनरला पोट दुखीमुळे बाहेर जावे लागले. यावेळी स्कॉट मैदानात येणे अपेक्षित होते. तो  तापाने फणफणत असल्याने यावेळी न्यूझीलंडचे सहाय्यक प्रशिक्षक ल्यूक रोंची यांना खेळाडूची जर्सी घालून मैदानात उतरावे लागले.

...आणि सचिन तेंडुलकरने स्वीकारले महिला क्रिकेटपटूचे चॅलेंज

भारत-न्यूझीलंड याच्यांतील दुसऱ्या सामन्यातील या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. प्रशिक्षक क्षेत्ररक्षणासाठी कसा आला? असा प्रश्न क्रिकेट चाहते थेट आयसीसीला विचारत आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २७३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव ४८. ३ षटकात २५१ धावांत आटोपला होता.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs new zealand 2nd odi Injury Crisis Forces New Zealand Fielding Coach Luke Ronchi To Field Against India Twitter Amused reactions at auckland eden park