पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : किवींनी भारताच्या 'कोहिनूर हिऱ्यांचा' जीव काढला!

आघाडीच्या फलंदाजांचे अपयश संघाचे अपयश

विश्वचषक स्पर्धेतील प्रबळ दावेदार असलेल्या विराट सेनेचा स्पर्धेतील प्रवास मँचेस्टरच्या मैदानावर संपुष्टात आला. भारतीय संघ समतोल असून विराटच्या नेतृत्वाखाली आम्ही तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची स्वप्न गेल्या दीड महिन्यापासून पाहत होतो. भारत-न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात बरसणाऱ्या पावसाने 'वनडे' सामना दोन दिवसीय करुन काही क्रिकेटप्रेमींची झोप मोडही केली. राखीव दिवशी स्वप्नांची राख झाली. आता आपल्याला रोहित शर्माची शतकं कोहलीचा रुबाब अन् जडेजाचे प्रयत्न फार फार तर धोनी परत धीम्या गतीनं खेळल्याचा गाजावाजा करुन समाधान मिळवण्यापलीकडे आता काहीही उरलेलं नाही.

खरंतर स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून भारतीय संघ समतोल असल्याचं चित्र कधीच दिसलं नाही. फलंदाजांनी नाराज केलं की गोलंदाजांन वाचवायाचं याला समतोल म्हणता येणार नाही. हा फक्त गोलंदाजी आणि फलंदाजीमधील ताळमेळ झाला. समतोल संघाचा अर्थ असतो एक फलंदाज फेल झाल्यानंतर त्याची जागा दुसऱ्या फलंदाजाने भरुन काढणे. ज्याला आम्ही सांघिक खेळ म्हणतो. साखळी सामन्यातील रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन 'कोहिनूर हिऱ्यांच्या' धावसंख्येशिवाय भारतीय धावफलक पाहिलात तर तुम्हाला कळेलं की यार....यांना अपयश आले तर आपल्याला तारणार कोण? साखळी सामन्यातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात आपल्याला त्याचा अनुभव आला होता. रोहित शर्माचे शतक आणि कोहलीच्या अर्धशतकानंतरही इंग्लंडने आम्हाला शह दिला होता. ही जोडी खेळून आम्हाला प्रतिस्पर्धी दमवत असेल तर ही जोडी फ्लॉप ठरल्यावर किवींनी जीव घेणे ही काही आश्चर्यकारक क्षण नाही.

#INDvNZ Semi: या पाच कारणामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील खेळ खल्लास!

भारताचा विजय रथ थांबवायचा असेल तर रोहित, विराटला बाद करा आणि सामना खिशात घाला, ही ऑफर साखळी सामन्यातच प्रतिस्पर्ध्याला कळली असती तर भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचलाच नसता. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अगदी तसंच झालं. स्पर्धेत शतकाची बरसात करणारा रोहित शर्मा लवकर बाद झाला. कोहलीनंही त्याचाच कित्ता गिरवला. या दोन हिऱ्यांना बाद केल्यानंतर विजयाचा 'नूर' हरवणे निश्चित होते. न्यूझीलंडंच्या गोलंदाजांनी ते करुन दाखवलं. आता पावसाची त्यांना साथ मिळाली का? याच उत्तर निश्चितच हो असं आहे. पावसामुळे खेळपट्टीने बदललेला रंग आणि किवी गोलंदाजांचा ढंग याचा सुरेख संगमामुळेच लयीत असलेल्या जोडीला स्वस्तात माघारी धाडणे शक्य झाले.  

 #INDvNZ टीम इंडियाचे तीन तेरा! यशस्वी त्रिकुट माघारी

या परिस्थितीत मध्यफळीतील एकाही फलंदाजाला जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणं जमलं नाही. रविंद्र जडेजाने फटकेबाजी करत सामना आवाक्यात आणला होता. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. खेळी महत्त्वपूर्ण निश्चित होती. जी खेळी विजय मिळवून देत नाही ती निरर्थक ठरते. आणि जडेजाची ही खेळी उत्तम निरर्थक खेळीतच गणलेली बरी. आघाडी कोलमडल्यानंतर जर बॅटला बॉल लागत असेल तर सामना संपवण्याची जबाबदारी ही त्या फलंदाजाने स्वत: आपल्यावर घ्यावी लागते. ती जबाबदारी जडेजाला घेता आली नाही. त्याची खेळी फक्त मांजरेकरला दाखवण्यापूर्ती लिमिटेड राहिली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs New Zealand 1st Semi Final Blog Team India zero Without Rohit Sharma and Virat Kohli Performance